IND vs SA: भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज टी-20 वर्ल्डकपचा फायनल सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 8 वाजता बार्बाडोसमध्ये हा सामना रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही टीम्सने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या फायनलमुळे कोणत्याही एका संघाची विजेतेपदासाठीची दीर्घ प्रतीक्षा संपणार हे निश्चित आहे. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांची कामगिरी चांगली झाली असून दोन्ही संघांनी एकही सामना गमावलेला नाही. दरम्यान फायनलपूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही टीम्सने यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरी गाठली पाहिजे. दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 च्या गट-2 मध्ये पहिले स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली होती. एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील या टीमने दमदार कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तानचा एकतर्फी 9 विकेट्सने पराभव केल आणि प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. टीम इंडियाने आपल्या सुपर-8 गटातही पहिले स्थान पटकावलं आणि त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडला 68 रन्सने पराभूत करून 10 वर्षांनंतर फायनलमध्ये प्रवेश केला.
शनिवारी म्हणजेच आज दोन्ही टीम्सने एकही सामना गमावला नसला तरी टीम इंडियाने ज्या प्रकारे जवळपास प्रत्येक सामना एकतर्फी जिंकला आहे ते पाहता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम अधिक मजबूत मानली जातेय. मात्र अशातच टीम इंडियाला एक बातमी आहे जी टीम इंडियासाठी वाईट मानली जातेय. आयसीसीने शुक्रवारी जाहीर केलेल्या अंतिम सामन्याच्या अंपायरबाबतची ही बातमी आहे.
ICC ने सांगितलं की, अंतिम सामन्यातील मैदांनी अंपायरची जबाबदारी ख्रिस गॅफनी (न्यूझीलंड) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) यांच्या खांद्यावर असणार आहे. तर टीव्ही अंपायर रिचर्ड कॅटलबरो (इंग्लंड) असणार आहेत. आता या तिन्ही अंपायरची नियुक्ती करण्याचं कारण म्हणजे त्यांची क्षमता आहे. शिवाय यापैकी कोणीही अंपायर भारत किंवा दक्षिण आफ्रिकेशी संबंधित नाही.
मात्र यावेळी टीम इंडियासाठी अडचण अशी आहे की, जेव्हा जेव्हा भारत कोणत्याही अंतिम सामन्यात किंवा बाद फेरीच्या सामन्यात खेळले आणि या तिन्ही अंपायर्स त्यामध्ये समावेश होता तेव्हा टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
गेल्या वर्षीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत गॅफनी आणि इलिंगवर्थ हे मैदानावरील अंपायर होते, तर कॅटलबरो हे टीव्ही अंपायर होते आणि टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये कॅटलबरो आणि इलिंगवर्थ हे मैदानावरील अंपायर होते आणि या अंतिम फेरीतही भारताचा पराभव झाला. टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात कॅटलबरो आणि इलिंगवर्थ हे देखील तीन अंपायपपैकी होते आणि टीम इंडियाने तो सामनाही गमावला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 2019 च्या वर्ल्डकपमध्येही इंग्लंडचे हे दोन अंपायर मैदानात होते. 2014 T20 वर्ल्डकप फायनल, 2015 वर्ल्डकप सेमीफायनल, 2016 T20 वर्ल्डकप सेमीफायनल आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्येही, Cattleborough एक मैदानी अंपायर होते आणि यावेळीही भारताने तिन्ही सामने गमावले.