जेष्ठ रंगकर्मी विनायक राणेंचं नाटकाचा प्रयोग सुरू असताना निधन

जेष्ठ रंगकर्मी विनायक राणे यांचे दुःखद निधन झाले आहे. नाटकाचा प्रयोग सुरू असताना हृदय विकाराच्या झटका आल्याने त्यांचं मंचावर निधन झाले.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 28, 2018, 11:28 PM IST
जेष्ठ रंगकर्मी विनायक राणेंचं नाटकाचा प्रयोग सुरू असताना निधन title=

औरंगाबाद : जेष्ठ रंगकर्मी विनायक राणे यांचे दुःखद निधन झाले आहे. नाटकाचा प्रयोग सुरू असताना हृदय विकाराच्या झटका आल्याने त्यांचं मंचावर निधन झाले.

रंगकर्मी विनायक राणे हे ५८ वर्षांचे होते. तापडिया नाटय मंदिरात सायंकाळी ७.३० वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. राज्य नाट्य स्पर्धेत ते ‘जिसने लाहोर नही देख्या’ नावाचे नाटक ते सादर करत होते. अनेक वर्ष ते हौशी रंगभूमीवर काम करत होते. अशातच त्यांनी मंचावरून एक्झिट घेतल्याने नाट्य क्षेत्रात दु:ख व्यक्त केलं जात आहे.  

राणे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने डॉक्टारांना बोलवण्यात आलं होतं. मात्र, काही उपचार करण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. अशाप्रकारे एका कलाकाराचं निधन होणं धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.