बसस्थानकावर चोरी करताना युवती सीसीटीव्हीत कैद

सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये बॅगांमधून पैशांची पाकिटं चोरी करणारी महाविद्यालयीन युवती सीसीटीव्हीत कैद झालीय.

Updated: Apr 19, 2018, 07:37 PM IST
बसस्थानकावर चोरी करताना युवती सीसीटीव्हीत कैद  title=

विकास भदाणे, झी मीडिया, सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये बॅगांमधून पैशांची पाकिटं चोरी करणारी महाविद्यालयीन युवती सीसीटीव्हीत कैद झालीय. स्टँड चौकीतील पोलिसांनी तिला एका गुन्ह्यात अटक केल्यानं खळबळ उडालीय. स्टँडमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही बसवले गेल्यानं ही कारवाई होण्यास मदत झाली. ज्यांची पर्स आणि कागदपत्र चोरी झाली आहेत. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. दीक्षा भोसले असं संशयित चोरी करणा-या युवतीचं नाव आहे. 

अक्षदा जाधव ही युवती तिच्या आजीसोबत शिवाजीनगरमध्ये जाण्यासाठी सातारा एस.टी. स्टँडवर  आली होती. गर्दीच्या वेळी एस.टी.मध्ये जात असताना अज्ञात चोरट्यानं तिची पैशांची आणि कागदपत्रांची पर्स चोरी केली. ही बाब अक्षदाच्या लक्षात आल्यानंतर तिनं एस.टी स्टँड पोलीस चौकीमध्ये धाव घेतली. अक्षदा जाधव ही युवती तिच्या आजीसोबत शिवाजीनगर येथे जाण्यासाठी सातारा एस.टी. स्टँडवर  आली होती. गर्दीच्या वेळी एस.टी.मध्ये जात असताना अज्ञात चोरट्याने तिची पैशांची व कागदपत्रांची पर्स चोरी केली. ही बाब अक्षदाच्या लक्षात आल्यानंतर तिने एस.टी स्टँड पोलिस चौकीमध्ये धाव घेतली.

चोरीची कबुली

चौकीतील पोलिस हवालदारांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात केल्यानंतर संशयित दीक्षा भोसले हिने पर्स चोरल्याचे फुटेजमध्ये दिसले. पोलिसांनी त्या युवतीला ताब्यात घेतल्यानंतर चोरीची कबुली दिली. दरम्यान, चोरीचे आणखी असे प्रयत्न केले असून तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, संशयित युवती सातारा येथे एका महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत आहे. उच्च शिक्षित युवतीकडून चोरीचे कृत्य घडल्याने  खळबळ उडाली आहे.