हिंगोली : शिवसेनेच्या (Shiv Sena) अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Rebel Eknath Shinde Group) गटात सामील झाले. यामुळे राज्यात अनेक दिवस सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. शिवसेनेचे जवळपास 40 आमदारांनी बंडखोरी केली. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्तास्थापन केल. या बंडखोरीमुळे एकनाथ शिंदे गटावर शिवसैनिकांकडून गद्दार असा उल्लेख केला. (rebel eknath shinde group mla santosh bangar give advice to her followers over to critic)
तर दुसऱ्या बाजूला या बंडखोर आमदारांनी आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत आल्याचं सांगितलं. तसेच महाविकास आघाडीत आमची गळचेपी होत असल्याने आम्ही एकनाथ शिंदेंसोबत आल्याचं या आमदारांनी म्हटलं. दरम्यान गद्दार या उल्लेखावरुन आमदाराने थेट हाणामारीचीच भाषा केली आहे.
आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम केलं पाहिजे, असा आदेशच हिंगोलीतल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या समर्थकांना दिला आहे.
"आपण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकानं केलं पाहिजे", असं आमदार बांगर म्हणाले.