येत्या २४ तासात खान्देशात पावसाची दाट शक्यता

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Jaywant Patil Updated: Mar 19, 2018, 05:41 PM IST
येत्या २४ तासात खान्देशात पावसाची दाट शक्यता title=

नाशिक : येत्या २४ तासांत राज्यातल्या बहुतांश भागात पाऊस होणार आहे. खान्देशातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं ही माहिती दिली आहे. या पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी योग्य काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  मागच्या आठवड्यातही राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता.

शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन

अवकाळी पावसात वीज पडण्याच्या घटना वाढतात, म्हणून शेतकऱ्यांनी झाडाखाली थांबू नये, अनेक शेतकरी ढगांचा गडगडाट सुरू झाल्यावर झाडाखाली जातात, पण अशावेळी झाडाखाली थांबू नये.