३२ वर्षापूर्वी सर्वात पहिली आत्महत्या करणारा शेतकरी

अन्नदात्यांसाठी आज नागपुरात अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं.

Jaywant Patil Updated: Mar 19, 2018, 05:30 PM IST
३२ वर्षापूर्वी सर्वात पहिली आत्महत्या करणारा शेतकरी title=

नागपूर : अन्नदात्यांसाठी आज नागपुरात अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण इथल्या साहेबराव करपे या शेतकर्‍याने शेती परवडत नाही म्हणून १९ मार्च १९८६ रोजी कुटुंबासह आत्महत्या केली होती. त्याला आता 32 वर्षे पूर्ण झाली. 

पहिली शेतकरी आत्महत्या

महाराष्ट्रातली ती अधिकृत अशी पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यानंतर हा आकडा दिवसेंदिवस वाढतच गेला.  सर्व शेतकर्‍यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी आज राज्यात ठिकठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात येतंय. 

आता 32 वर्षे पूर्ण झाली

नागपुरात जनमंच अॅग्रोव्हेट अग्रो इंजिनिअर्स मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील महाराजबाग चौकाजवळ सकाळी 11 पासून अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं.