मुंबई : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. शेकापचे वर्चस्व असणाऱ्या या जिल्ह्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. येथे शेकापचा सुपडा साफ झाला. श्रीवर्धनमध्ये शिवसेनेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विनोद घोसाळकर यांचा पराभव नवख्या आदिती तटकरे यांनी केला आहे. ही जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. तसेच उरणमध्ये शिवसेनेला भाजप बंडखोराचा फटका बसला. त्यामुळे शिवसेनेला येथे पराभवाचा धक्का बसला. येथे अपक्ष महेश बल्दी यांनी सेनेचे मनोहर भोईर यांना धूळ चारली.
पनवेलमधील जागा भाजपने आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. याठिकाणी प्रशांत ठाकूर विजयी झालेत. तर महाडमध्ये काँग्रेसला यश मिळवता आले नाही. येथे शिवसेनेचे भरत गोगावले विजयी झालेत. अलिबागमध्ये शिवसेनेने जोरदार बाजी मारली आहे. येथून महेंद्र दळवी यांनी शेकाप उमेदवारा धूळ चारत विजय मिळवला. तर पेणमध्ये भाजपने शेकापचे उमेदवार धैर्यशील पाटील यांना पराभूत केले.
विजयी आणि पराभूत उमेदवार
- महाड - भरत गोगावले (शिवसेना ) 102273 विजयी तर माणिक जगताप ( काँग्रेस) पराभूत 80698
- पनवेल - प्रशांत ठाकूर (भाजप) 179109 विजयी , शेकापचे हरेश केणी - 168 86379
-अलिबाग - महेंद्र दळवी (शिवसेना) 108081 विजयी , सुभाष पंडित पाटील (शेकाप) 74550
- श्रीवर्धन - अदिती सुनील तटकरे (राष्ट्रवादी) 92074 विजयी , विनोद घोसाळकर (शिवसेना) 52453
- पेण - रवीशेठ पाटील (भाजप) 112380विजयी , धैर्यशील मोहन पाटील (शेकाप) 88329
- उरण - महेश बल्दी (अपक्ष) 74549 विजयी, भाजप बंडखोर , मनोहर भोईर (शिवसेना) 68839