VIDEO: पहाटेची वेळ! अर्धनग्न अवतारात 'तो' आला आणि... असं काय घडलं ज्यानं गाव खडबडून जागं झालं...

Pune: गावाची सकाळची खासियत हीच आहे की गावात भल्या पहाटे कोंबडा आरवतो आणि अख्खं गाव उठतं परंतु इथे काहीतरी भलतंच घडलं आहे. या गावात चक्क चोराच्या हालचालीनंच अख्खं गावं उठलं आहे. परंतु असं काय केलं त्या चोरानं हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा (Chicken Thief Pune) झाला आहे. 

Updated: Jan 17, 2023, 03:39 PM IST
VIDEO: पहाटेची वेळ! अर्धनग्न अवतारात 'तो' आला आणि... असं काय घडलं ज्यानं गाव खडबडून जागं झालं...  title=

Pune: गावाची सकाळची खासियत हीच आहे की गावात भल्या पहाटे कोंबडा आरवतो आणि अख्खं गाव उठतं परंतु इथे काहीतरी भलतंच घडलं आहे. या गावात चक्क चोराच्या हालचालीनंच अख्खं गावं उठलं आहे. परंतु असं काय केलं त्या चोरानं हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा (Chicken Thief Pune) झाला आहे. त्याचबरोबर या घटनेचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. कोंबडी चोरायला आलेल्या एका चोरानं गावात हास्याचे लोट उडवून दिले आहेत. हा व्हिडीओही सध्या सगळकीडेच व्हायरल होतो आहे. (Pune Yawat Village Chicken thief caught on CCTV camera)

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक माणूस ज्यानं फक्त एक पॅन्ट घातली आहे त्याच्यावर त्यानं काहीचं घातलेले नाही. त्याचबरोबर त्यानं चेहऱ्यावर रूमाल पांघरला आहे. अशा अवस्थेत ही व्यक्ती येते आणि चक्क एक कोंबडी चोरून निघून जाते. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. पुण्याच्या यवत या भागात हा प्रकार घडला आहे. गावामध्ये कोंबड्या या सुरक्षित ठेवलेल्या असताना असा प्रकार का घडला यानं सगळ्यांनांच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

दौंड तालुक्यातील यवत गावातील विद्या विकास मंदिर विद्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या गाळ्यामध्ये दीपक कदम राज चिकन सेंटर या नावाचा चिकनचा व्यवसाय अनेक वर्ष्यापासून करत आले आहेत. दीपक कदम यांचे नाव पंचक्रोशीतील यशस्वी व्यावसायिक असा आहे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून जिद्दीने व कष्टाच्या जोरावर दीपक कदम आज यशाच्या शिखरावर असून त्यांचे नाव पंचक्रोशीतील लोक देखील आदाबीने घेतात सोशल मीडियावर मात्र आज एका व्हिडीओमुळे राज चिकन सेंटर (Chicken Centre) चांगलेच चर्चेत आहे.

पहाटे 1 वाजून 44 मिनिटे या वेळेत राज चिकन सेंटर समोर असणाऱ्या खुरवड्यातुन एक व्यक्ती चोरट्या पावलाने येत एक कोंबडी घेऊन गेला असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून कोंबडी चोरणारा कोंबडी चोर सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हायरल व्हिडीओबाबत दीपक कदम यांना संपर्क केला असता सकाळी जेव्हा दुकान उघडण्यासाठी आलो तेव्हा खुरवड्यामध्ये एक कोंबडी कमी असल्याचे आढळले म्हणून CCTV कॅमेरा चेक असता पहाटे 1 वाजून 44 मिनिटे या वेळेत एक अनोळखी व्यक्ती कोंबडी चोरून घेऊन गेल्याचे स्पष्ट दिसत आहे असे सांगितले.

यवत पोलीस स्टेशन मध्ये कोंबडी चोराच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे दीपक कदम यांनी सांगितले. यवत मध्ये कोंबडी चोराचा कोंबडी चोरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) पाहून यवत मध्ये मात्र एकच हस्या पिकला आहे.