टोल नाका पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर हलवा, आंदोलनकर्ते सुप्रीया सुळेंच्या भेटीला

टोल नाका पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर हलवण्याची टोल नाका विरोधी कृती समितीची मागणी

Updated: Feb 16, 2020, 11:45 AM IST
टोल नाका पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर हलवा, आंदोलनकर्ते सुप्रीया सुळेंच्या भेटीला title=

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाका पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर हलवण्याची टोल नाका विरोधी कृती समितीची मागणी आहे. त्यासाठी आज कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. 

या आंदोलनात स्थानिक आमदार खासदार यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी होत आहेत. खासदार सुप्रीया सुळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.  

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत. 

आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पुणे सातारा मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.