पुणे रेल्वे स्थानकावरील एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय रेल्वेने सोशल मीडिया हँडल X (ट्वविटरवर) रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या सुरक्षा जवानांच्या शौर्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ट्रेनची धडक बसली आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला. ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या तरुणाला पाहताच एक सुरक्षा कर्मचारी लगेच तिथे पोहोचतो. तत्परता दाखवत तो पटकन त्या तरुणाला स्वतःकडे ओढतो आणि त्याला वाचवतो.
स्टेशनवर कर्तव्यावर असलेल्या एमएसएफ (मेडिकल सेन्स फ्रंटियर्स) कर्मचाऱ्यांच्या एका सदस्यानेही तरुणांना ट्रेनखाली जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना फलाटावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Amidst the hustle at Pune station, MSF staff Mr. Digambar Desai's quick action and bravery saved a passenger from a near-fatal accident on board train no. 11301 Udyan Express. A true testament to dedication to passenger service pic.twitter.com/hcGncUV94x
— DRM Pune (@drmpune) March 28, 2024
ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करताना, रेल्वेने लिहिले की, “पुणे स्थानकावरील गर्दीच्या वेळी, MSF कर्मचारी सदस्य दिगंबर देसाई यांच्या जलद कृती आणि धैर्याने उद्यान एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाला अपघात होण्यापासून वाचवले. प्रवासी सेवेसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचा हा खरा पुरावा आहे.” 2 दिवसांपूर्वी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. 28 मार्च रोजी रेल्वेने हा व्हिडिओ शेअर केला होता.
दुसऱ्या पोस्टमध्ये, DRM पुणे यांनी प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंती केली आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे तुमचा जीव जाऊ शकतो. आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अशा गैरवर्तणामध्ये अपघात होऊन जीव जाण्याचा धोका अधिक असतो.