'पीटी टीचरने आम्हाला बॅड टच..' पुण्यात अवघ्या 10 वर्षाच्या विद्यार्थीनींनी केली शिक्षकाची पोलखोल

Pune PT teachers Bad Touch: पुण्यातील लोहगाव परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीटी शिकवणाऱ्या शिक्षकानेच शाळेतील दोन विद्यार्थीनींचा विनयभंग केला. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 31, 2023, 10:49 AM IST
'पीटी टीचरने आम्हाला बॅड टच..' पुण्यात अवघ्या 10 वर्षाच्या विद्यार्थीनींनी केली शिक्षकाची पोलखोल title=

सागर आव्हाड, झी मीडिया पुणे: लहान मुलांना शालेय जीवनापासूनच गुड टच, बॅड टचबद्दल शिकवले जाते. याचा पुढे जाऊन विद्यार्थ्यांना फायदा होतो. कोणीही व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन वेगळ्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते त्याची माहिती देतात. यामुळेच पुण्याच्या शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीटी शिक्षक बॅट टच करत असल्याची तक्रार10 वर्षाच्या मुलींसोबत आपल्या पालकांकडे केली. यानंतर भयानक घटना समोर आली आहे. 

पुण्यातील लोहगाव परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीटी शिकवणाऱ्या शिक्षकानेच शाळेतील दोन विद्यार्थीनींचा विनयभंग केला. पीडित विद्यार्थ्यीनींनी आपल्यासोबत घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर विद्यार्थिनींच्या आईने शिक्षकाविरोधात तक्रार दिली. यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोहगाव येथे केंद्रीय विद्यालयात आरोपी शिक्षक हा शारीरिक शिक्षण शिकवतो. दोन आठवड्यांपूर्वी आरोपी शिक्षकाने मैदानावर वाईट उद्देशाने मुलीच्या अंगाला स्पर्श केला, असे तक्रारदार पालकांनी सांगितले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर आणखी एका विद्यार्थिनीलाही त्याने बॅड टच केला. तुला पीटी क्लास कसा वाटला असे विचारून शिक्षकाने अश्लील कृत्य केल्याचे विद्यार्थीनीच्या पालकांनी तक्रारीत म्हटले. 

पीडित मुलींनी घरी गेल्यानंतर आपल्या आईला संपूर्ण हा प्रकार सांगितला. यानंतर घरच्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर मुलींच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठत शिक्षकाविरोधात तक्रार दिली. विमानतळ पोलिसांनी शाळेत जाऊन या प्रकरणाची चौकशी केली. पीटी शिक्षकाविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. 

IPS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या

'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

पुण्यात राहणाऱ्या तरुणीने आपल्या लिव्ह इन पार्टनरविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. या दोघांमध्ये मागच्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. दरम्यान 25 ऑगस्ट च्या रात्री हा वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळाले. सय्यद अर्षद अली  असे या आरोपीचे नाव असून तो नागपूर येथील भालदार पुरा बडी मशिदीजवळ राहतो.  तर फिर्यादी तरुणी ही 23 वर्षांची आहे.

फिर्यादी तरुणी तिच्या कामाच्या ठिकाणी होती. यावेळी आरोपी त्या ठिकाणी गेला आणि फिर्यादीला आपल्यासोबत येण्याची मागणी करु लागला. फिर्यादी तरुणीने यासाठी नकार दिला. पण थोड्यावेळाने आरोपी यासाठी जबरदस्ती करू लागला. दरम्यान तू माझ्यासोबत बाहेर आली नाही तर तुझ्यावर तेल फेकेल अशी धमकी आरोपीने तरुणीला दिली.  तरुणीने प्रियकराविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंस्टावर भाईगिरीच्या रिल्स लाईक करताय? पोलिसांची तुमच्यावरही आहे नजर