पुणे अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासे, आरोपीच्या घरातील सीसीटीव्हीत छेडछाडीचा प्रयत्न

Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलं आहे. तर आरोपी मुलाच्या आजोबांची आणि ड्रायव्हरची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत.

निलेश खरमारे | Updated: May 24, 2024, 04:50 PM IST
पुणे अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासे, आरोपीच्या घरातील सीसीटीव्हीत छेडछाडीचा प्रयत्न title=

Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणात दरोरज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील सहाही आरोपींना शिवाजीनगर कोर्टात (Shivaji Nagar Court) हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाच्या वकीलांनी आरोपी विशाल अग्रवालच्या (Vishal Patil) घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या (CCTV) डीव्हीआरमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केलाय. तसंच विशाल अग्रवाल यांच्या घरातील गेटवरील नोंदणी रजीस्टर, मोबाईल ताब्यात घेतले असून मोबाईलमधील डाटाचं विश्लेषण सुरू आहे. गाडीची नोंदणी झाली नसून, ब्रह्मा लेजेस कंपनीच्या नावावर गाडी आहे. ड्रायव्हरकडे आणखी चौकशी करायची असून सर्व आरोपींचीही चौकशी करण्यासाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकीलांनी केलीये. त्याचबरोबर ड्रायव्हर आणि विशाल अग्रवालची समोरासमोर चौकशी करायचीये. आरोपीसोबत आणखी काही मित्र होते का त्या सर्वांनी दारूशिवाय आणखी काही सेवन केलं होतं का याचाही तपास करायचा असल्याचं सरकारी वकीलांनी सांगितलंय. तर आरोपींवर लावण्यात आलेली कलमं जामीनपत्र असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकीलांकडून करण्यात आलाय.

विशाल अगरवालवर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार. तसंच अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला तु कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग असं विशाल अगरवालने ड्रायव्हरला सांगितल्याच पोलिस तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार. तर विशाल अगरवालवर आर टी ओ च्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसतांना नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल गुन्हा दाखल करण्यात येणार.

ड्रायव्हरला अडकवण्याचा प्रयत्न
अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला आमिष दाखवल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिलीय. पोर्श कारने जेव्हा दोघांना कारखाली चिरडलं तेव्हा अल्पवयीन आरोपी कार चालवत होता. जमावाने त्याला चोपल्याचंही दृश्यांमध्ये दिसतंय. मात्र आरोपींकडून कार चालक बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांकडून कार चालक गंगाधर पुजारी याला मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिलीय. पोलीस आयुक्तांनीही याची गंभीर दखल घेतलीय. कारण पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी कलम 120 चाही समावेश केलाय.

ड्रायव्हरचे कॉल रेकॉर्ड्स तपासणार
या प्रकरणी पोलीस संबंधित ड्रायव्हरचे कॉल रेकॉर्ड्स तपासणारेत. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा हे रेकॉर्ड्स तपासणारेत. पोलिसांनी ड्रायव्हर पुजारीचे सीडीआर म्हणजे कॉल रेकॉर्ड्स काढलेत. 19 तारखेला अपघात झाला त्यावेळी हा ड्रायव्हर त्या गाडीत होता का हे सुद्धा पोलीस तपासत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ड्रायव्हरची कसून चौकशी केलीये...

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन पुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली. आरोपीविरोधात भक्कम केस उभी करण्याचा प्रयत्न असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. विशाल अग्रवालच्या मुलावर आयपीसी कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलीय...