Pune News : पुणेकरांनो गर्दी करू नका! जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार

Petrol Pump strike : पुण्यात आजपासून पेट्रोल पंप बंद राहणार नाही. सर्व पेट्रोल पंप खुले राहतील अस स्पष्टीकरण ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन सांगितल आलंय.

सौरभ तळेकर | Updated: Jan 2, 2024, 12:04 PM IST
Pune News : पुणेकरांनो गर्दी करू नका! जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार title=
Pune News, petrol pumps

Pune Petrol pumps will remain open : केंद्र सरकारने वाहन चालकाच्या बाबतीत नवा कायदा केला असून या कायद्याच्या विरोधात पेट्रोल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपीसी एल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे. राज्यभरात आजपासून तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहणार अशी अफवा सर्वत्र पसरली आणि काल रात्री पुणे शहरासह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी पंपावर गर्दी केली. पण आजपासून पेट्रोल पंप बंद राहणार नाही. सर्व पेट्रोल पंप खुले राहतील अस स्पष्टीकरण ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन सांगितल आलंय.

सर्व गोष्टी सुरळीत असताना देखील सकाळपासून पुण्यातील विविध पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी केली आहे. पुण्यातील लोणी काळभोर पेट्रोल डिझेल टर्मिनल मधून वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे शहर,पुणे ग्रामीण,पिंपरी चिंचवड शहर सातारा,अहमदनगर आणि इतर ठिकाणी पेट्रोल डिझेल टँकर वाहतुक सुरू असून वाहतूकदार संपाचा परिणाम टर्मिनस वर झालं नसून पेट्रोल डिझेल टँकर भरून बाहेर पडत आहेत. मात्र अस असल तरी काही पंपावर टँकर पोहचले नसल्याने पंप बंद आहे, तर काही ठिकाणी पंपावर नागरिकांकडून मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. 

कल्याण डोंबिवलीतील पेट्रोल पंपांवर वाहनचाकाची पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड मोठ्या रांगा लावलेल्या आहेत. पेट्रोल डिझेलचा तुटवडा होऊ शकतो या भीतीने वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचे अनुचित प्रकार घडू नये याकर्ता पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आले आहे. ट्रक चालकांनी संप पुकारल्याने हजारो ट्रक छत्रपती संभाजी नगरात उभे असून वाहन चालक देखील संपात सहभागी झाले आहेत. वाहन चालक सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली आणि नागरिकांनी थेट पेट्रोल पंप गाठलं. आपल्या वाहनांमध्ये इंधन भरुन घेण्यासाठी पंपावर मोठी गर्दी उसळली. काहींनी गरजेपेक्षा जास्त इंधन वाहनातून भरून घेतल्याने काही पंपांवरील इंधन संपल्याचं पहायला मिळालं आहे.