पुण्यात गुटखा भरलेले चार ट्रक पकडले

 अन्न आणि औषध प्रशासनानं संयुक्तपणे चाकणमध्ये ही कारवाई केलीय. हे चारही ट्रक गुजरातमधून आले होते. 

Jaywant Patil Updated: Mar 17, 2018, 12:49 AM IST
पुण्यात गुटखा भरलेले चार ट्रक पकडले title=

पुणे : पुण्यात गुटखा भरलेले चार ट्रक पकडण्यात आलेत. पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनानं संयुक्तपणे चाकणमध्ये ही कारवाई केलीय. हे चारही ट्रक गुजरातमधून आले होते. 

गुटख्याची किंमत लाखोंच्या घरात

चार ट्रक भरुन असलेल्या या गुटख्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. हा सगळा गुटखा चाकणमध्ये विक्रीसाठी आणण्यात आला होता. गुटख्याचे व्यापारी आणि मुख्य आरोपी गणेश बो-हाडे, निलेश बो-हाडे याच्यासह चार ट्रकचालकांना ताब्यात घेण्यात आलंय. 

मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतुकीची प्रकरण

राज्यात गुटखा बंदी असताना, मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीची प्रकरण बाहेर येत आहेत, गुटखा विक्री थांबवणे तसेच वाहतूक करताना गुटखा पक़डणे सर्वात महत्वाचे ठरत आहे.