आताची मोठी बातमी! रायगडमध्ये शाळेच्या सहलीच्या बसला अपघात, काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती

आताची मोठी बातमी! रायगडमध्ये शाळेच्या सहलीच्या बसला अपघात, काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती

Updated: Nov 11, 2022, 08:05 PM IST
आताची मोठी बातमी! रायगडमध्ये शाळेच्या सहलीच्या बसला अपघात, काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती title=

रायगड : रायगडमधून आताची मोठी बातमी समोर येत आहे. रायगडमध्ये माणगावजवळ शाळेच्या सहलीच्या बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे इथल्या ज्ञान प्रबोधनी स्कूलच्या शाळेतील विद्यार्थी रायगडमध्ये सहलीला आले होते. माणगाव ते किल्ले रायगड रस्त्यावर घरोशी वाडी इथे त्यांच्या बसला अपघात झाला. घरोशी वाडी इथल्या रस्त्याच्या बाजूला बस 15 ते 20 फूट खाली कोसळली. या अपघातात 15 विद्यार्थी जमखी असल्याची प्राथमिक माहिती आहे.