कुस्तीच्या आखाड्यात राजकारण; शरद पवारच कसलेले पैलवान; महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या वादात मोठा ट्विस्ट

मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची नवी समिती बरखास्त केल्याने शरद पवार हेच अध्यक्ष राहतील, अस बाळासाहेब लांडगे म्हणाले.

Updated: Nov 11, 2022, 07:53 PM IST
कुस्तीच्या आखाड्यात राजकारण; शरद पवारच कसलेले पैलवान; महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या वादात मोठा ट्विस्ट title=

Maharashtra Kesari Kusti, पुणे :   कुस्तीच्या आखाड्यात राजकारणाची लढाई रंगली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्तीचा(Maharashtra Kesari Kusti) वादात मोठा ट्विस्ट आला आहे.  मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची(Maharashtra Kesari Kusti Parishad) नवी समिती बरखास्त केली आहे. या निर्णयाविरोधात  कुस्तीगीर परिषदेचे  सरचिटणीस बाळासाहेब लांडगे(Balasaheb Landge ) यांनी हाय कोर्टात(High Court) धाव घेतली होती. यानंतर हाय कोर्टाने लांडगे यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. यामुळे स्पर्धेच्या आयोजनाचा अधिकार आपल्यालाच असल्याचा दावा  बाळासाहेब लांडगे यांनी केला आहे. तसेच मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची नवी समिती बरखास्त केल्याने शरद पवार हेच अध्यक्ष राहतील, असंही बाळासाहेब लांडगे म्हणाले.

भारतीय कुस्ती संघाने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती केली होती रद्द 

भारतीय कुस्ती संघाने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती रद्द केली होती. त्यानंतर भारतीय कुस्ती संघाकडून भाजप खासदार रामदास तडस यांच्या अधघ्यक्षतेखाली नवीन समिती नियुक्त करण्यात आली होती. हायकोर्टाने कुस्तीगीर परिषदेच्या नवनियुक्त समितीला बरखास्त केली. यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्याआयोजनावरुन दोन्ही गटांमध्ये वाद पेटला होता.  

वादाच्या भोवऱ्यात सापडलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच असल्याचा दावा कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी केला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बरखास्त केली होती. हा निर्णय बेकायदा असल्याचं सांगत कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने लांडगे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. 

दरम्यान बाळासाहेब लांडगे विरोधी गटाकडून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा या आधीच करण्यात आलेली आहे. येत्या डिसेंबरमध्ये पुण्यात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठान तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. असं असताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची घटना तसेच उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय या आधारावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकार राज्य कुस्तीगीर परिषदेलाच आहे.

राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्न असलेल्या सात जिल्ह्यांनी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची मागणी केली आहे. याबाबत कुस्तीगीर परिषदेची समिती निर्णय घेईल अशी माहिती बाळासाहेब लांडगे यांनी दिली आहे. भारतीय कुस्ती महासंघाकडे आपल्या विरोधात आकस बुद्धीने तक्रारी केल्या आहेत.  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या गटाकडून आपली बदनामी केली गेली. भारतीय कुस्ती महासंघाकडे आपल्या विरोधात आकस बुद्धीने तक्रारी केल्या गेल्या. मात्र न्यायालयाकडून आपल्याला न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया लांडगे यांनी दिली आहे.