Pune Crime : मुठा नदीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; 10*10 च्या खोलीसाठी सख्ख्या भावाने केले बहिणीचे तुकडे

Pune Crime : पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते मुठा नदीत फेकण्यात आले होते. हे धड कोणाचं याचा उलगडा पुणे पोलिसांनी केलाय. या हत्येमागे कोण आहे, शिवाय अंगावर काटा आणणाऱ्या घटनाक्रम समोर आलाय. 

नेहा चौधरी | Updated: Sep 2, 2024, 10:36 AM IST
Pune Crime : मुठा नदीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; 10*10 च्या खोलीसाठी सख्ख्या भावाने केले बहिणीचे तुकडे title=
pune crime news mutha river women body sister killed brother and sister in law arrested due to house dispute

Pune Crime : एका महिलेचे शीर धडावेगळे करून तिचा मृतदेह खराडीतील मुठा नदीपात्रात टाकलेल्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावण्यात यश आलंय. त्या महिलेची हत्या करणाऱ्या व्यक्तींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. तो मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 10 बाय 10 च्या घरासाठी सख्या भावाने आणि वहिनीने तिची हत्याचा केल्याचा उलगडा झालाय. 

हा खून इतक्या निर्घृणपणे करण्यात आला की पोलिसांना पुरावे मिळू नये म्हणून भावाने आपल्या बहिणीच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुडके केले. धुणीभांडी करणारी सकीना खान शिवाजीनगर भागातील झोपडपट्टीत एका 10 बाय 10 आकाराच्या खोलीत एकटीत राहायची. मात्र हीच खोली तीच्या जीवावर उठली, कारण सख्खा भाऊ अश्फाक खानचा सकीनाच्या खोलीवर डोळा होता. याच मालमत्तेच्या वादातून अश्फाकने त्याच्या बायकोच्या मदतीने सकीनाचा निघृणपणे हत्या केली. 

असा उघड झाला प्रकार

पुण्यातील पाटील इस्टेट भागतील एका खोलीवरुन भाऊ अन् बहिणीत अनेक महिन्यांपासून वाद सुरु होता. ही खोली सकीनाचा नावावर होती. पण भाऊ अश्फाक आणि वहिनी हमीदाने तिच्यामागे खोली रिकामी करण्यासाठी तगादा लावला होता. पण सकीना घर सोडून जाणार नाही यावर ठाम होती. हा राग मनात ठेवून भाऊ आणि वहिनीने तिच्या हत्येचा कट रचला. तिची गळा दाबून हत्या केली आणि पोलिसांना काही कळू नये म्हणून घरात धारदार शस्त्राने मृतदेहाचे अनेक तुकडे तुकडे केले. त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी पुण्यात खूप पाऊस होता त्या दिवशी संगमवाडीमधील नदीपात्रात (Pune Crime News) फेकून दिलं.

पण शेजारी राहणाऱ्या लोकांनी सकीना कुठे गेली हे विचारल्यावर त्यांनी सकीना गावाला गेली अशी खोटी माहिती पसरवली. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा हा सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सकीनाचा खून प्रकरणात अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केलीय.