पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....'

Sharad Pawar News : राज्याच्या राजकारणात चर्चा एका बड्या नेत्याच्या संतापाची. शरद पवार यांचा संताप पाहून सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले? पाहा सविस्त वृत्त...   

सायली पाटील | Updated: Mar 8, 2024, 09:38 AM IST
पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....' title=
Political news ncp leader Sunil tatkare on sharad pawars statment on maval mla sunil shelke latest news

Sharad Pawar News : गुरुवारी लोणावळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना ज्येष्ठ नेते आणि राजकारणातील मुरब्बी शरद पवार यांचे कणखर बोल आणि त्यांचे दरडावणारे शब्द सर्वांच्याच भुवया उंचावून गेले. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर ताशेरे ओढत शरद पवार यांनी त्यांना थेट इशारा दिला आणि राजकीय वर्तुळात सर्वांच्याच नजारा पवारांकडे वळल्या. 

'तू आमदार कुणामुळे झाला, माझ्या वाटेला गेला तर मी सोडत नाही.  लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात', अशा शब्दांत शरद पवार यांनी सुनील शेळकेंना इशारा दिला आणि यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेते सुनील तटकरे यांनीसुद्धा शरद पवार यांच्या संतप्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. हे वक्तव्य अनाकलनीय असल्याचं तटकरे म्हणाले. सुनील शेळके यांच्याकडून अशी कोणतीही कृत्य घडू शकत नाहीत असं म्हणत तटकरेंनी त्यांची बाजू घेतली आणि काही गैरसमज असल्यास ते दूर होतील असंही तटकरेंनी स्पष्ट केलं. 

हेसुद्धा वाचा : 'मोदी-शाहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश..'; ठाकरे गटाचा टोला! चंद्रचूड यांच्याकडून न्यायाची अपेक्षा

 

मावळची जनता चांगली ओळखते... 

आमदार सुनिल शेळके यांच्यावर शरद पवार यांनी केलेल्या आक्रमक टीकेवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी अशी संतप्त प्रतिक्रिया का दिली हे अनाकलनीय असल्याचं ते म्हणाले. सुनील शेळके यांना मावळची जनता चांगली ओळखते, ते 90 हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यांच्याकडून असं कोणतंही कृत्य कधीच घडू शकत नाही असं असं ठामपणे म्हणत तटकरेंनी शेळके यांची बाजु मांडली. सदर प्रकरणात काही हितसंबंधीय व्यक्तींनी वेगळं सांगितल्याने समज गैरसमज झाले असतील पण, ते उद्याच्या काळात दुर होतील, असंही तटकरे म्हणाले. 

काय म्हणाले  होते शरद पवार? 

लोणावळ्यातील कार्यकर्ता मेळावा शरद पवार यांच्या वक्तव्यामुळं अधित गाजला. "तू आमदार कोणामुळे झाला? तुझ्या सभेला कोण आलं होत? त्यावेळी पक्षाच्या अध्यक्षपदी कोण होतं? तुमच्या फॉर्मवर माझी सही आहे. माझ्या सहीने तुम्ही निवडून आलात, आज तुम्ही त्याच पक्षाच्या , विचाराच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता? पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला'', असं शरद पवार म्हणाले होते. 'मी या रस्त्याने कधी जात नाही. पण त्या रस्त्याने जाण्याची स्थिती तुम्ही निर्माण केली तर सोडतही नाही', असा इशाराही त्यांनी शेळकेंना दिला.