Political News : सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - शरद पवार आज एकाच मंचावर

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याची मोठी उत्सुकता आहे. 

Updated: Jan 21, 2023, 10:40 AM IST
Political News : सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - शरद पवार आज एकाच मंचावर  title=
Maharashtra Political News । Ekanath Shinde । Sharad Pawar

Politics News : राज्यातील राजकीय सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. (Pune News) पुण्यात मांजरी इथे वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटची आज 46 वी  सर्वसाधारण सभा होणार आहे. सकाळी 11 वाजता ही सभा आहे.(Maharashtra Political News) या कार्यक्रमात पवार आणि शिंदे एकत्र असणार आहेत.(Maharashtra Political News in Marathi)

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचं वितरणही या कार्यक्रमात होणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे आहे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा होते. दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्रीही या सभेला हजेरी लावतात. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर प्रथमच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. यानिमित्ताने शिंदे आणि पवार हे एकाच व्यासपीठावर येत आहेत. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  त्यामुळे या सभेत नेमकी समस्यांच्या मांडणीसाठी कोणती साखरपेरणी होणार? याकडे साखर वर्तुळासह राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. 

वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि  संचालक अजित पवार,  उपाध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील,  विश्वस्त, नियामक मंडळाचे सदस्य, राज्य सहकारी साखर कारखाना संघ, सहकार व साखर विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

तसेच साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणार्‍या 2021-2022 मधील विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे साखर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्यांमधील अधिकारीही उपस्थित राहतील. केंद्र सरकारने साखर निर्यातीला खुल्या परवान्याखाली (ओजीएल) परवानगी देण्याऐवजी कोटा पध्दतीने निर्यातीचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्राच्यावतीने केंद्राकडे ओजीएलखाली साखर निर्यातीस परवानगी देण्याच्या मागणीबाबत पाठपुरावा करण्याची मागणी कारखानदारांकडून होण्याची अधिक शक्यता आहे.