लाचखोर पोलीस उपनिरिक्षकाल पोलीस ठाण्यातच बेड्या

पोलीस उपनिरीक्षक परदेशी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Updated: Aug 14, 2018, 01:14 PM IST
लाचखोर पोलीस उपनिरिक्षकाल पोलीस ठाण्यातच बेड्या title=

नाशिक: महिपाल परदेशी या पोलीस उपनिरिक्षकाला पोलीस ठाण्यातच अटक करण्यात आलीय. अंबड पोलीस ठाण्यातल्या परदेशीला लाच घेताना रंगेहात अटक केलीय. तक्रार अर्जावरून कारवाईसाठी परदेशीनं तक्रारदाराकडे ५ हजारांची मागणी केली. लाचलूचपत विभागानं सापळा रचून ही लाच घेताना परदेशीला अटक केली. परदेशीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय़.

अंबड पोलीस ठाण्यात सापळा 

प्राप्त माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्यात एका तक्रारदाराने तक्रार दिली होती़ या तक्रार अर्जावरून कारवाई करण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महिपाल परदेशी यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात परदेशी यांच्या विरोधात तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सोमवारी अंबड पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला होता. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्यात तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारली असता परदेशी यांना यावेळी अटक करण्यात आलीय.

गुन्हा दाखल

पोलीस उपनिरीक्षक परदेशी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये या प्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आलाय.