गणेशभक्तांना 'इथे' मिळणार टोलमाफीसाठी पास

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 22, 2017, 10:47 AM IST
गणेशभक्तांना 'इथे' मिळणार टोलमाफीसाठी पास title=

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  

मुंबई-गोवा महामार्गावरुन कोकणात जाणाऱ्या गाड्यांना टोलमाफी करण्यात आली आहे.

गणेशोत्सवादरम्यान टोलमूळे या महामार्गावर वाहतूककोंडी होत असते. हे टाळण्यासाठी टोलमाफी देण्यात आली आहे.

ही टोलमाफी मिळण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन पाससाठी माहिती द्यावी लागणार आहे.

या  टोलमाफीसाठी नागरिकांनी आपले नाव, वाहनाचे नाव, कोठे जाणार त्या गावाचे नाव आदी माहिती जवळच्या पोलीस स्थानकात द्यावी असे आवाहन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

कोणत्या मार्गाचा कराल वापर ?

-मुंबई-गोवा  महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी रायगडमध्ये जाणाऱ्यांनी द्रुतगती मार्गे खोपोली, पाली मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-रत्नागिरीत जाणाऱ्यांनी कराड-चिपळूण मार्गाचा, सिंधुदुर्गला जाणाऱ्यांनी कोल्हापूर, गगनबावडा मार्गे, सावंतवाडीला जाणाऱ्यांनी निपाणी, आंबोली घाटमार्गाचा वापर करावा. 

 अशा आहेत उपाययोजना 

 -या मार्गावर पोलिस, संबंधित जिल्हा प्रशासन व परिवहन विभागातर्फे एकत्रितपणे मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. 
 -वाहतूक कोंडीच्या काळात मदतीसाठी क्रेन, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.