Palghar News : मद्यधुंद शिपायाकडून डॉक्टरच्या सल्ल्याशिवायच चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न; खळबळजनक प्रकार उघड

Palghar Shocking News : सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी राज्यातील इतर महत्त्वाच्या सुविधांमध्ये असणारे खाचखळगे पाहून त्यावर तातडीनं तोडगा काढावा, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया 

Updated: Mar 27, 2023, 12:48 PM IST
Palghar News : मद्यधुंद शिपायाकडून डॉक्टरच्या सल्ल्याशिवायच चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न; खळबळजनक प्रकार उघड  title=
palghar news drunken peon tried to handle monir patient in health center

Palghar Shocking News : एकिकडे आरोग्य क्षेत्रात जगभरात प्रगतीचे टप्पे ओलांडले जात असताना काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहेत. अद्यापही बऱ्याच भागांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत. तर कुठे सुविधा आहेत, पण प्रशिक्षित आरोग्य अधिकाऱ्यांचा अभाव आहे. अशीच एक धक्कादायक घटना महाराष्ट्रातील पालघर येथे पाहायला मिळाली. 

पालघरमध्ये आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी सुरू असणारा खेळ नुकताच एका धक्कादायक घटनेतून समोर आला. तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी शिपायाकडून चिमुकलीवर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा मद्यपी शिपाई डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, रुग्णासोबत असलेल्या कुटुंबीयांनी त्याला रोखून धारेवर धरल्याने मोठा अनर्थ टळला.

palghar news drunken peon tried to handle monir patient in health center

 

मद्य प्राशन केल्याची कबुली शिपायाकडून देण्यात आली असून या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर राहत नसल्याची ओरड यापूर्वीही ऐकायला मिळाली होती. असं असूनही पालघर जिल्हा परिषद प्रशासन आणि सरकार यावर कठोर कारवाई करण्यात अजूनही अपयशी ठरत असल्याचंच वारंवार समोर येत आहे. दरम्यान या खळबळजनक प्रकरणानंतर रुग्णालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या मद्यपीवर कारवाई करण्याची मागणी उचलून धरण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : Pakistan Economy Crisis : केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; आता उपाशी रहावं का? 

दरम्यान, पालघर आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उजेडात आणताच तातडीने मद्यपी कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला निलंबित करण्यात आलं. रुग्णालयात मद्यपी कर्मचाऱ्याकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू होता, ज्यानंतर हा सर्व प्रकार उघड़कीस आला. या मद्यपी कर्मचाऱ्याचा व्हिडिओ झी 24 तासवर दाखवताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तातडीने या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले. तसंच असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी जिल्हा परिषद पूर्ण काळजी घेईल असं आश्वासन देखील दिलं आहे.