सीएम ऑडिओ क्लिप प्रकरण : सेनेच्या आरोपांना भाजप उत्तर देणार?

सेनेच्या आरोपांना भाजप उत्तर देणार का? हे आजच्या दिवसात समोर येणार आहे. 

Updated: May 26, 2018, 09:20 AM IST
सीएम ऑडिओ क्लिप प्रकरण : सेनेच्या आरोपांना भाजप उत्तर देणार? title=

पालघर : पालघरमध्ये आज प्रचार संपणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे.  सेनेच्या आरोपांना भाजप उत्तर देणार का? हे आजच्या दिवसात समोर येणार आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणूकसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आलाय

पैसे वाटल्याचा आरोप

पालघर लोकसभा पोट निवडणुकीत भाजपनं पैसे वाटल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.... पालघरमधल्या रानशेत गावात काही लोकांना पकडण्यात आलंय. निवडणूक पथकानं ही कारवाई केलीय..... रानशेतमध्ये प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या.... शिवसेनेच्या नेत्यांनी या लोकांना पकडून दिलं... शिवसेनेनं रंगेहाथ पकडलेल्या लोकांना पोलिसांनी अतिथी हॉटेलमधून ताब्यात घेतलं.