कोरोना रुग्णांचा झिंग-झिंग-झिंगाट डान्स व्हायरल...पाहा उत्साह

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या पाहायला मिळाली आहे.

Updated: May 18, 2021, 10:35 PM IST
कोरोना रुग्णांचा झिंग-झिंग-झिंगाट डान्स व्हायरल...पाहा उत्साह title=

जामखेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या पाहायला मिळाली आहे. खरंतर कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा ही जास्त भयानक आहे. कारण यावेळचा कोरोना म्यूटेंट हा आकाराने लहान असल्याने तो हवेत जास्त काळ तरंगतो. यामुळे लोकांमध्ये वेगाने हा कोरोना पसरतो आणि जास्तीत जास्त लोकं यामुळे संक्रमीत होत आहेत. अचानक वाढलेल्या रुग्ण संख्येचा ताण रुग्णालये आणि औषधांवर येऊ लागला, त्यामुळे ऑक्सिजन, लस, इंजेक्शन आणि बेड्स सारख्या गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला. तसेच वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

या सगळ्या प्रकरणामुळे डॅाक्टर आणि फ्रंटलाईन वर्करवर मोठा ताण पडला आहे. त्यांना 10/12 तास पीपीई कीट घालून आणि मास्क लाऊन काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर देखील याचा परिणाम होऊ लागला आहे.

फ्रंटलाईन वर्कर बरोबरच कोरोना रुग्णांची मानसिक परिस्थिती खालावते. या परिस्थितीमुळे अनेक रुग्णं घाबरतात आणि त्यांच्या मनात वाईट विचार यायला सुरु होतात. त्यांच्या वरील हा ताण कमी करण्यासाठी रुग्णालयातील लोकं किंवा कोणता दुसरा रुग्ण काही ना काही उपक्रम करत असल्याचे  तुम्ही व्हिडीओ पाहिले असणारच. असाच एक उपक्रम एका रुग्णालयाने राबवला आहे.

रुग्ण, डॅाक्टर आणि परिचारिका यांच्या वरील मानसिक त्रास कमी करण्यासाठी कर्जत जामखेडमधील गायकरवाडी येथील आरोळे रुग्णालयात म्यूझीक थेरपी चा एक उपक्रम राबवण्यात आला आहे. ज्यामध्ये रुग्णांपासून ते नर्सपर्यंत सगळेच लोकं डान्स करताना तुम्हा पाहू शकतात. तुम्हा पाहू शकता की, कसे सगळे लोकं आपलं सगळं दुख: विसरुन मनसोक्त नाचण्याचा आनंद घेत आहेत.

हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. यानंतर हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.