'आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा नंबर? जावयासोबत जेलमध्ये जाणार' भाजप नेत्याचा इशारा

'चौकशी समितीला सामोर जावून पुरावे दाखवा, पुरावे नसतील तर कारवाई होईल'  

Updated: Jul 31, 2022, 02:41 PM IST
'आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा नंबर? जावयासोबत जेलमध्ये जाणार' भाजप नेत्याचा इशारा title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडीकडून (ED) चौकशी सुरु आहे. यावरुन राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यातच आता भाजपच्या (BJP) एका नेत्याने आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे सुद्धा जेलमध्ये जातील असा इशारा भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिला आहे.  भोसरी भुखंड प्रकरणावरुन एकनाथ खडसे यांनी नाव घेता गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला होता. या आरोपांना भाजप नेते गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. 

मंत्री असतांना खडसेंनी गैरकृत्य केलं, चुकीची कामे केली, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला. त्यामुळे ते चौकशींच्या फेऱ्यांमध्ये सापडले आहेत. त्यांचे जावई वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. रजीस्ट्रार सुध्दा जेलमध्ये आहे. आता फक्त कोर्टाची नो कोर्सीव ॲक्शन असल्यामुळे खडसे जेलमध्ये जात नाहीये. कोर्टाची ॲक्शन हटल्यावर जावयासोबत एकनाथ खडसे सुध्दा जेलमध्ये जातील,असा इशाराही गिरीश महाजन यांनी दिला आहे. 

तर आम्ही त्यांना जेलमध्ये टाकतोय या खडसेंच्या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही. तुम्ही पाक असाल तर चौकशी समितीला सामोर जावून पुरावे दाखवा, पुरावे नसतील तर कारवाई होईल असही महाजन यांनी यावेळी सांगितलं.