नागपूर : राज्याच्या अनेक भागात मान्सून दाखल झालाय पण अजून तो विदर्भात दाखल झालेला नाही. या आठवड्यात मान्सून विदर्भात दाखल होण्याचा अंदाज आहे.
अर्थात पावसाळी वातावरण विदर्भात आहे त्यामुळे तापमानात गेल्या महिन्याच्या तुलनेत घट आहे. मात्र ढगाळ हवामानामुळे आर्द्रता वाढलीय. त्यामुळे शेतकरी असो की शहरातला नागरिक सर्वचजण मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेत.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणून मान्सूनला उशीर झाल्याचं सांगितलं जातंय. मान्सून पूर्व पावसाने विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात हजेरी लावली. येत्या १५ ते १६ जूनला मान्सून विदर्भात दाखल होण्याचा अंदाज आहे.