मुंबई : कोरोनानंतर (Coronavirus) आता निपाहचा (Nipah) धोका वाढला आहे. राज्यातल्या वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच निपाह व्हायरस सापडला आहे. हा नवा उडता धोका निर्माण झाला आहे. राज्यात पहिल्यांदाच वटवाघळांमध्ये निपाह हा खतरनाक व्हायरस सापडला आहे. (Nipah virus found in in Maharashtra) पुण्यातल्या NIV नं केलेल्या संशोधनातून हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. वटवाघूळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह व्हायरस सापडला आहे. महाबळेश्वरमधल्या एका गुहेतल्या वटवाघूळांमध्ये निपाह आढळला. (Nipah virus found in two bat species in Maharashtra)
निपाह व्हायरस हा जगातला खतरनाक व्हायरस समजला जातो.WHOने जाहीर केलेल्या जगातल्या दहा धोकादायक व्हायरसमध्ये निपाहचा समावेश होतो. वटवाघूळांमध्ये हा व्हायरस आढळतो. निपाह व्हायरसवर औषध किंवा लस नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निपाहचा मृत्यूदर 65 ते 100 टक्के एवढा आहे.
दरम्यान, याआधी राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल येथे दिली.
गेल्या काही वर्षांमध्ये वटवाघूळांपासून माणसाला धोका वाढत आहे. इबोला, निपाह, मारबर्ग या व्हायरसचे वटवाघूळांपासूनच संक्रमण झाले आहे. कोरोनाही वटवाघूळांपासूनच आल्याबद्दलही अभ्यास सुरू आहे. त्यामुळे वटवाघूळांवर नेहमीच संशोधन सुरू असते. आतापर्यंत महाराष्ट्रात वटवाघूळांमध्ये निपाह कधीच आढळला नव्हता. आता चार वटवाघूळांमध्ये निपाह आढळल्यानंतर आता आणखी किती वटवाघूळांना याचे संक्रमण झाले आहे. माणसापर्यंत पोहोचण्याचा धोका कसा टाळता येईल, यावर तातडीने पावले उचलावी लागणार आहेत.