पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ब्राह्मण समाजाविषयीच्या वक्तव्यावरून पुण्यात जोरदार राडा झाला. मिटकरींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही इथे जमा झाले. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मिटकरी यांच्या भाषणावर आक्षेप
सांगलीतल्या इस्लामपूर इथल्या सभेत बोलताना अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख खाज ठाकरे असा केला होता. त्यावर मनसेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर अमोल मिटकरींचं आणखी एक वक्तव्य वादात सापडलं आहे. भाषणात मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप ब्राम्हण समाजाने केला आहे.
अमोल मिटकरींचं ते भाषण
अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात एक किस्सा सांगितला. मी एका लग्नात गेलो होतो. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झालेली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते,'मम भार्या समर्पयामी'. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं. अरे येड्या ते महाराज म्हणतायत, मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा, आरारारा... कधी सुधारणार. असं मिटकरी यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.
ब्राम्हण समाज आक्रमक
अमोल मिटकरींच्या या विधानावर ब्राम्हण समाज आक्रमक झाला असू मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मिटकरींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.
माफी मागण्यासा नकार
दरम्यान अमोल मिटकरी यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहावा, मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलं नाही, याला कोणीही जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करु नये असं मिटकरी यांनी म्हटलं होतं.