Video : राजकारणाच्या आखाड्यातून थेट क्रिकेटच्या मैदानात; नवनीत राणा यांची जबरदस्त बॅटिंग

राजकारणाच्या आखाड्यात दमदार कामगिरी करणाऱ्या नवनीत राणा यांनी क्रिकेटच्या मैदानातही आपली कमाल दाखवली. क्रिकेटच्या पीचवर  नवनीत राणा यांनी जबरदस्त बॅटिंग केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Updated: Dec 4, 2022, 08:54 PM IST
Video : राजकारणाच्या आखाड्यातून थेट क्रिकेटच्या मैदानात; नवनीत राणा यांची जबरदस्त बॅटिंग title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांचे वेगळेच रुप अमरावतीकरांना पहायला मिळाले.  राजकारणाच्या आखाड्यात दमदार कामगिरी करणाऱ्या नवनीत राणा यांनी क्रिकेटच्या मैदानातही आपली कमाल दाखवली. क्रिकेटच्या पीचवर  नवनीत राणा यांनी जबरदस्त बॅटिंग केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

राजकारणात नेहमी ठाकरे गटावर व उद्धव ठाकरेंवर टिकेची फटकेबाजी करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज क्रिकेटच्या मैदानातही आपली जोरदार फटकेबाजी केली. अमरावती शहरात असलेल्या वेलनेस सेंटरच्या उटघाटनासाठी खासदार नवनीत राणा आल्या होत्या याच ठिकाणी अंबिका नगर मध्ये काही तरुण क्रिकेट खेळत होते. 

याच दरम्यान खासदार नवनीत राणांचे लक्ष क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडे गेले आणि खासदार नवनीत राणांनीही त्यांच्या सोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. नवनीत राणा यांनी मनसोक्तपणे क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.