Rupali Patil: "...तर त्यांची जीभ छाटली पाहिजे", रुपाली ठोंबरेंची Prasad Lad यांच्यावर सडकून टीका!

Maharastra Politics: भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी पुन्हा बेताल वक्तव्य केलंय. त्यावर आता राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी सडकून टीका केली आहे.

Updated: Dec 4, 2022, 07:08 PM IST
Rupali Patil: "...तर त्यांची जीभ छाटली पाहिजे", रुपाली ठोंबरेंची Prasad Lad यांच्यावर सडकून टीका! title=
Rupali Patil

Rupali Patil On Prasad Lad: मागील काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांकडून (Maharastra Politics) वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. राज्यपाल भगतिसंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेला वाद अद्याप थांबला नसल्याचं दिसतंय. वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरु असतानाच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी पुन्हा बेताल वक्तव्य केलंय. त्यावर आता राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी सडकून टीका केली आहे.

काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे पाटील?

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा इतिहास माहित नसेल तर माहिती करून घ्यावा मग बोलावं. पण सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची जीभ छटावी अशी कठोर शिक्षा दिल्याशिवाय सुधारणार नाही असं वाटतंय, असं विधान रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी केलंय. इतिहासाचे अज्ञान असलेले भंगार सत्ताधारी, असं म्हणत त्यांनी भाजपला (BJP) देखील निशाण्यावर घेतलं.

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म कोकणात झाला, असं वक्तव्य भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलंय. कोकण महोत्सवाच्या निमित्तानं प्रसाद लाड यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लाड यांनी हे वक्तव्य केलंय. त्यानंतर मोठा वाद उद्भवला असल्याचं दिसतंय.

आणखी वाचा - Udayanraje Bhosale: "राजकारणी मुग गिळून गप्प बसतात, विचारांचा कडेलोट...", उदयनराजेंचं शिवरायांना भावनिक पत्र!

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत... तरी देखील महाराजांवर अनेक वादग्रस्त वक्तव्य होत असल्याने राज्याचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय, असा सवाल आता नेटकरी उपस्थित करत आहे. वादग्रस्त वक्तव्य करून कोणता इतिहास नावावर करायचाय, असा सवाल देखील उपस्थित होताना दिसतोय.