Nashik Graduate Elections :नाशिक पदवीधर निवडणुकीचे महानाट्य, भाजपच्या शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या संपर्कात

Nashik Graduate Constituency Election : भाजपकडून शुभांगी पाटील - सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचे कबुल करण्यात आले होते. (Maharashtra Political News) आता त्यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधत पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

Updated: Jan 14, 2023, 02:50 PM IST
Nashik Graduate Elections :नाशिक पदवीधर निवडणुकीचे महानाट्य, भाजपच्या शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या संपर्कात title=
Nashik Graduate Constituency Election Shubhangi Patil

Nashik Graduate Elections : नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहेत. ( Nashik Graduate Constituency Election ) काँग्रेसचे उमेदवारी जाहीर होऊनही सुधीर तांबे  (Sudhir Tambe) यांनी निवडणूक अर्ज भरला नाही. तर त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. आता तर भाजपचे उमेदवार नाराज बंडखोरीच्या तयारीत आहेत. भाजपकडून शुभांगी पाटील - सूर्यवंशी (Shubhangi Patil) यांना उमेदवारी देण्याचे कबुल करण्यात आले होते. मात्र, ती न मिळाल्याने त्यांनी बंडखोरीची तयारी केली आहे. (Maharashtra Political News) आता त्यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधत पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चूरस दिसून येत आहे. (Maharashtra Political News in Marathi)

मातोश्रीवर रणनीती, निवडणुकीबाबत बैठक सुरु

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत मातोश्रीवर बैठक सुरु आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे नाशिक गटनेते विलास शिंदे जिल्हाप्रमुख विजय काळसकर हे मातोश्रीवर दाखल आहेत. नाशिकच्या कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबत चर्चा होत आहे. खासादर संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. तसेच महाविकास आघाडीकडून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार नाही. त्यांनी पक्षाला फसविले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. त्यामुळे आता महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता आहे. याबाबत मातोश्रीवर रणनीती ठरणार आहे. सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही, नाना पटोले म्हणाले - पुढचा निर्णय हायकमांड घेणार!...

नाशिक निवडणुकीमध्ये आता 22 अपक्ष मैदानात 

नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये आता 22 अपक्ष मैदानात राहिले आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 44 उमेदवारांनी अर्ज भरला होता. यामध्ये भाजपचे तीन उमेदवार होते. मात्र त्यांना मुदतीत एबी फॉर्म न दिल्यामुळे आता त्यांनी बंडखोरी करण्याची भाषा सुरु केली आहे. शुभांगी पाटील सूर्यवंशी यांनीही भाजपने होकार दिल्याने अर्ज भरला होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे. आता त्यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधत पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. या प्रक्रियेमध्ये लोकशाहीचा खून करण्यात आल्याची प्रतिक्रिया देत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. तर राष्ट्रवादीने हा घात असल्याचं म्हटले आहे. Satyajeet Tambe : नाट्यमय घडामोडी... अखेरच्या क्षणी काँग्रेसकडून सत्यजित तांबे रिंगणात

कोण आहेत शुभांगी पाटील? 

ॲड. शुभांगीताई पाटील - सूर्यवंशी या  नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात एकमेव महिला उमेदवार आहेत. त्या  महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा आहेत. शुभांगी पाटील आता अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत. त्यांनी महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यांना एबी फॉर्म दिला गेला नाही.