नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान शरद पवार नागपुरात आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. नागपुरात शरद पवार यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार ते नागरिकत्व सुधारणा कायद्यावरही शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा सरकार मागे घेईल असं वाटत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह दोघेही जिद्दी आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. बिगर मुस्लिम समाजातून कायद्याला विरोध होतोय ही सरकारसमोरची मोठी अडचण आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय.
प्रचारात काँग्रेसच्या नेतृत्वाने लक्ष अधिक घातलं असतं तर आघाडीच्या सीट्स वाढल्या असत्या असा टोला पवारांनी मारला. तर भाजपला देशात पर्यायी नेतृत्व निर्माण होत नाही, मात्र राज्याराज्यात पर्याय निर्माण होतील असं पवार यांनी म्हटलंय. सध्या नागपुरात दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.