शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

 कोल्हापूरचे शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Updated: Dec 18, 2019, 05:47 PM IST
शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार title=

कोल्हापूर : कोल्हापूरचे शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं मूळ गाव उंबरवाडी इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण आलं. २००२ मध्ये जोतिबा चौगुले मराठा लाईट इन्फन्ट्रीत रूजू झालेले.

शहीद जवान जोतिबा चौगुले यांचा जन्म २३ सप्टेंबर १९८२ या दिवशी झाला. बालपणापासून धाडसी वृत्तीचे असलेले चौगुले मराठा लाईट इन्फन्ट्रीत भारतमातेच्या रक्षणासाठी रूजू झाले. 

जोतिबा यांच्या पश्चात पत्नी यशोदा, ९ वर्षांचा मुलगा अथर्व आणि ३ वर्षांचा मुलगा हर्षद असा परिवार आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं जनसागर लोटला होता.