मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि नारायण राणे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. शाह यांनी राणेंना दोन्ही बाजू समजावून सांगितल्यात. त्यामुळे पुढचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार राणेंचा असून ते दस-याला आपला निर्णय घेतील असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरात बोलत होते. तसंच सत्तेत राहून आंदोलन करणा-या शिवसेनेवरही चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. अशा आंदोलनांमुळे शिवसेनेचंच हसू होत असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.