दोन दिवसाच्या बालकाचं रुग्णालयातून अपहरण

बुरखाधारी महिलेनं दोन दिवसाच्या बालकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्याच्या खामगाव उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. सुमय्या बी. नावाच्या महिलेने दोन दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ आणि बाळंतिण यांना रुग्णालयाच्या वॉर्ड नंबर पाचमध्ये ठेवण्यात आलं.

Updated: Sep 27, 2017, 12:04 PM IST
दोन दिवसाच्या बालकाचं रुग्णालयातून अपहरण  title=

बुलडाणा : बुरखाधारी महिलेनं दोन दिवसाच्या बालकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्याच्या खामगाव उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. सुमय्या बी. नावाच्या महिलेने दोन दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ आणि बाळंतिण यांना रुग्णालयाच्या वॉर्ड नंबर पाचमध्ये ठेवण्यात आलं.

मात्र रात्री 3 च्या सुमारास एक बुरखाधारी महिला आणि एक मुलगा इंडिका कारमधून उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यानंतर त्यांनी सुमय्याच्या दोन दिवसाच्या बाळाला घेऊन रुग्णालयातून पळ काढला. अपहरणाची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. घटनेनंतर निवासी वैद्यकीय अधिकारी तात्काळ तिथे दाखल झाले. त्यांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.