५० किलो वजनाचा मासा जाळ्यात!

...

Updated: Jun 10, 2018, 09:13 AM IST
५० किलो वजनाचा मासा जाळ्यात! title=

नंदुरबार : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथील यशवंत तलावात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या आदिवासी तरुणांना ५० किलो वजनाचा सिल्व्हर आफ्रिकन जातीचा मासा सापडलाय. एखाद्या तलावात एवढा मोठा मासा सापडणे ही खान्देशातली पहीलच घटना आहे.

तोरणमाळ येथील यशवंत तलावात बाराही महिने मोठ्या प्रमाणात पाणी असते या ठिकाणी मासेमारी करून आदिवासी आपला उदर निर्वाह करीत असतात नेहमी प्रमाणे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणांनी मासेमारीसाठी खोल जाळे टाकले असता त्यांच्या जाळ्याला हा अवाढव्य मासा लागला त्या नंतर हा मासा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली.

यशवंत तलावात मागे १० वर्षांपूर्वी ही असा मोठा मासा सापडल्याचे गावकऱ्यांनी सांगितलंय. तोरणमाळ सातपुड्याच्या दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी मोबाईल नेटवर्क सुद्धा नाहीये. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी या माश्याची माहिती सोशल मीडियावर टाकल्यावर ही बाब समोर आली. एवढा मोठा मासा सापडल्यानंतर जिल्ह्यात एकच चर्चेचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे हा मासा संपुर्ण गावासाठी मेजवानी देऊन खेल्याची चर्चा आहे.