तरुणीची अशी ही बनवाबनवी... आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, लग्न करत संसार थाटायचा आणि मग ...

Cheating on marriage : एका तरुणीचा कारनामा पाहिल्यास धक्का बसेल. आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्याच्याकडील पैसा बघून लग्नाचा खटाटोप करायचा. लग्न झाल्यावर संसार काही दिवस थाटायचा आणि नंतर भांडण उकरुन...

Updated: May 5, 2022, 12:03 PM IST
तरुणीची अशी ही बनवाबनवी... आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, लग्न करत संसार थाटायचा आणि मग ... title=

नागपूर : Cheating on marriage : एका तरुणीचा कारनामा पाहिल्यास धक्का बसेल. आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्याच्याकडील पैसा बघून लग्नाचा खटाटोप करायचा. लग्न झाल्यावर संसार काही दिवस थाटायचा आणि नंतर भांडण उकरुन काढून वाद घालायचा. या वादानंतर पोलिसांची भीती दाखवत किंवा धमकी देत नवऱ्याला आणि त्यांच्या कुटुंबीयाना लुटायचे. असा प्रकार पाच जणांच्या बाबतीत घडला. मात्र, एक दिवशी हा सगळा बनाव उघड झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीसह तिच्या मित्राला अटक केली आहे.

लग्नाच्या जाळ्यात ओढून पाच प्रेमी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लुबाडणाऱ्या लुटेरी दुल्हनला नागपुरात अटक झाली. मेघारी तिजारे आणि मयूर मोटघरे अशी आरोपींची नावं आहेत. मेघाली ही तरुण आणि पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळात अडकवत होती. त्यांनंतर त्यांच्याशी लग्न करुन नंतर भांडणं उकरून काढत त्यांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळत होती. 

2020 मध्ये मेघालीने महेंद्र वनवानी या व्यावसायिकाला तिने प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्न केलं. त्यानंतर या लुटेरी दुल्हनने वनवानी आणि त्याच्या कुटुंबाविरोधात हुंड्यासाठी छळ इतर कलमाद्वारे पोलिसांत गुन्हा दाखल केला. तसेच पाच लाखांची खंडणीही मागितली. वनवानी कुटुंबाने ही तक्रार पोलिसांत दाखल केल्यावर लुटेरी दुल्हनचे सगळे कारनामे बाहेर आले. पोलिसांनी तिला अटक केली आहे.