मेट्रोची झिरो माईल ते कस्तुरचंद पार्क स्टेशनपर्यंत यशस्वी ट्रायल रन

ही अतिशय महत्वपूर्ण मार्गिका असून या मार्गिकेवर विधान भवन,रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि कस्तुरचंद पार्क असे महत्वाचे ठिकाण आहेत.

Updated: Jun 2, 2021, 08:19 PM IST
मेट्रोची झिरो माईल ते कस्तुरचंद पार्क स्टेशनपर्यंत यशस्वी ट्रायल रन  title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर मेट्रोनं अजून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. आज रिच-2 मार्गिकेवरील (सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटिव्ह चौक मार्ग) झिरो माईल ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनपर्यंत यशस्वी ट्रायल पार पडली. या वर्षा अखेरिस डिसेंबरपर्यंत सिताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान प्रवासी सेवा सुरु करण्याचा महामेट्रोचा मानस आहे. त्यादृष्टीनं आजची या मार्गकेवरील ट्रायल रन महत्वाचा ठरणार आहे. (nagpur maha metro succesfully trial run during zero mile to kasturchand park on reach 2) 

झिरो माईल ते कस्तुरचंद पार्क या मार्गिकेवर 1 किलोमीटर अंतर आहे. या दोन स्टेशन दरम्यान 20 किमी प्रतितासच्या वेगानं मेट्रोची ही ट्रायल रन घेण्यात आली. या मार्गिकेवरील सिग्नलिंग, ओएचई (विद्युत खांब) आणि ट्रॅकचे कार्य पूर्ण झाल्याने सदर ट्रायल रन पूर्ण सुलभतेने करण्यात यश आले. 20 माळ्यांच्या झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन या इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून या ट्रेनचं संचालन होणार आहे.

झिरो माईल मेट्रो स्टेशन येथे अनोखे मास स्प्रिंग सिस्टम (एमएसएस) बसविण्यात आले आहे. सदर मास स्प्रिंग सिस्टम हे मेट्रो रेल्वे गाडीच्या हालचालीमुळे उद्भवणारे कंपन थांबवतं. वायाडक्ट येथे अशा प्रकारचे फ्लोटिंग ट्रॅक स्लॅबवर यंत्रणा बसविणारे नागपूर प्रकल्प पहिला मेट्रो प्रकल्प आहे. 

मेट्रोची रिच 2 ही अतिशय महत्वपूर्ण मार्गिका असून या मार्गिकेवर विधान भवन,रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि कस्तुरचंद पार्क असे महत्वाचे ठिकाण आहेत.

तसेच झिरो माईल व कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन सिव्हिल लाईन्स परिसरातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिक कार्यरत आहे. त्यामुळं या मार्गिकेवर मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर मोठा लाभ येथे कार्यालयात येणा-यांना होणार आहे. मार्गिकेवर फोर लेअर डबर डेकर उड्डाणपूल तयार होणार आहे. तो देशातील पहिलाचं अशाप्रकारचा उड्डाणपूर असणार आहे. नागपूर मेट्रोची सीताबर्डी ते खापरी आणि सीताबर्डी ते लोकमान्यनगर या दरम्यान सेवा सुरु करण्यात आलेली आहे.