सचिन कसबे, पंढरपूर, झी २४ तास : कोरोनामुळे (Corona) वर्षभरात अनेक धार्मिक कार्यक्रम आणि जत्रोत्सव रद्द करावे लागले. यामध्ये आषाढी वारीही (Aashadhi Wari) रद्द करावी लागली. वारकऱ्यांना वर्षभरापासून लाडक्या विठुमाऊलीचं दर्शन झालेलं नाही. वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची ओढ लागलीय. मात्र यंदाच्या वारीवरही कोरोनाचं संकट आहेच. वारकऱ्यांना विठुरायाची ओढ स्वस्थ बसू देत नाहीये. या संदर्भात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत वारीचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या वर्षीतरी विठुरायाचे दर्शन होणार की नाही, याकडे तमाम वारकरी सांप्रदायाचं लक्ष लागून राहिले आहे. (important meeting of the Vitthal Rukmini Temple Committee will be held on June 3 in the context of Ashadi Wari)
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत आम्ही कोरोनाच्या नियमांच पालन करु, पण पायी वारी काढू द्यावी, अशी भूमिका पालखी प्रमुखांची आहे.
"वारीबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा"
"वारकरी संपद्राय सांगतो ते करतो, हे गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव आहे. पण, वारीत इतर घटकही सहभागी होतात, हे आपल्या सर्वांना माहितीये. वारीबाबतचा निर्णय झालेला नाही. याबाबतचा निर्णय पुढील कॅबिनेटच्या बैठकीत होईल. यादरम्यान सर्वांच मत जाणून घेण्यात येईल. त्यानंतर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतील", अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
दरम्यान आता त्यानंतर गुरुवारी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची महत्वाची बैठक होणार आहे.
..असा आहे यंदाचा पायी वारीचा कार्यक्रम
देहूमधून तुकोबांचं प्रस्थान 1 जुलैला नियोजित आहे. तर आळंदीमधून माऊलींचं प्रस्थान 2 जुलै रोजी होणार आहे. या पायी वारीमध्ये वारकऱ्यांना अनेक गावांमध्ये मुक्काम करावा लागतो. या पालखी मार्गावरच्या काही गावांमध्ये अजूनही कोरोनाचा संसर्ग आहे. त्यात सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये आहे. त्यामुळं पालख्या पंढरपुरात पोहोचल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा बो-या वाजण्याची शक्यता आहे.
पायी वारीचं भवितव्य हे येत्या काही दिवसांमध्ये कोरोना स्थिती कशी आहे, यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे कोरोना स्थिती नियंत्रणात यावी, अशीच इच्छा प्रत्येक वारकऱ्याची असणार आहे.
त्यामुळे गेल्या काही दशकांपासून पायी निघणाऱ्या वारीला मंजूरी मिळणार की मागील वर्षाप्रमाणे पालख्या एसटीतून पंढरपूर मुक्कामी पोहोचणार, याकडं वारकरी मंडळींचे डोळे लागलेत.
संबंधित बातम्या :
Maharashtra HSC Exam : बारावीच्या परीक्षेबद्दल मोठी घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
नाशिककरांसाठी मोठी बातमी | खासगी रूग्णालयात आता कोरोना उपचार नाहीत