मुरबाड रोडवर पेट्रोल पंप पाण्यात, १५० जणांचा गच्चीवर आसरा

'झी २४ तास'चे रिपोर्टर मयुर निकम या भागात उपस्थित आहेत. या भागात ते अडकून पडले असले तरी आपल्या वाचकांपर्यंत / प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहचवण्याचं काम ते करत आहेत

Updated: Jul 27, 2019, 09:08 AM IST
मुरबाड रोडवर पेट्रोल पंप पाण्यात, १५० जणांचा गच्चीवर आसरा title=

गणेश कवडे, झी २४ तास, कल्याण : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरापासून पाऊस जोरदार कोसळतोय. उल्हास नदीनंही धोक्याची पातळी ओलांडलीय. कल्याणच्या कांबा भागात पाणी भरल्यानं मुरबाड रोडवर असलेल्या वरप गावानजिकच्या पेट्रोल पंपाजवळ पाणी साजलंय. यामुळे पेट्रोल पंप पूर्णत: पाण्यात गेलाय. या भागातील गाड्याही पाण्याही बुडाल्यात. या भागातील आणि गाड्यांतील नागरिकांनी सुरक्षेसाठी पेट्रोल पंपाच्या गच्चीवर आसरा घेतलाय. इथं जवळपास १५० लोक अडल्याची माहिती मिळतेय. 


पावसाची दृश्यं

'झी २४ तास'चे रिपोर्टर मयुर निकम या भागात उपस्थित आहेत. या भागात ते अडकून पडले असले तरी आपल्या वाचकांपर्यंत / प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहचवण्याचं काम ते करत आहेत. लवकरच या भागात एनडीआरएफची टीम दाखल होत असल्याचं समजतंय.  


पावसाची दृश्यं

दरम्यान, मुंबई, कोकण विभागात काल दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वात जास्त परिणाम रायगड, महाड, बदलापूर, विभागात झाला असून काही गावचे संपर्कदेखील तुटला आहे तर काही ठिकाणी रेल्वे गाड्याही अडकल्या आहेत. त्याठिकाणी एनडीआरएफचे जवान दाखल झाले झाले असून त्यांना बाहेर काढणायचे काम सुरू आहे. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी शाळा सुट्टीचा निर्णय हा त्या विभागातील मुख्याध्यापक यांनी निर्णय घ्यावा, असं आवाहन केलं आहे. मुंबईमधील सखल भागांत पाणी जमा झालंय. मुंबईतील रेल्वे वाहतुकीला याचा फटका जास्त फटका बसला नसला तरी रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम जाणवतोय.