मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, 'या' मागण्या सरकार मान्य करतील का?

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच सरकारला दिलेला वेळ आता संपत असून जरंगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी रवाना झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करतील का? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Jan 20, 2024, 12:35 PM IST
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, 'या' मागण्या सरकार मान्य करतील का?  title=

Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले असून आरक्षणाच्या मागणीवरुव त्यांनी आता थेट सरकारला इशारा दिला आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आंतरवाली सराटीमधून निघालेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत लाखोंचा जनसमुदाय देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे जरांगे हे आंदोलनावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. 

सात महिने आम्ही वेळ दिला होता. मात्र यापेक्षा आणखी सरकारचे मराठा समाजाने काय ऐकायचे? मुंबईला गेल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे गावागावातून मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या मराठा पोरांच्या पाठीमागे उभे राहा असे आवाहन मनोज जरांगे यांनी समाज बांधवांना केले आहे. तुमच्या लेकराला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून  मुंबईच्या दिशेने झुंज द्यायला चाललोय असेही जरांगे यांनी सांगितले. एकाही मराठ्यांनी घरी न राहता आपली ताकत 26 जानेवारीला दाखवून दिली पाहिजे असे जरांगे म्हणाले आहे.

  • तब्बल ७ महिन्यांचा अवधी सरकारला दिला. मात्र, सरकार अजूनही कोणताच निर्णय घेत नाही. 
  • आता पर्यंत तब्बल 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत. पण त्यांना अद्यापही देखील प्रमाणपत्र मिळालेले नाही.
  • मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा
  • कोपर्डीतील तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या
  • मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना निधी आणि सरकारी नोकरी द्या
  • दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसींचा सर्व्हे करा. सर्व्हे करून प्रगत जाती आरक्षणातून बाहेर काढा
  • सारथी मार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी द्या. त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा
  • महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल. पण एनटी, व्हिजेएनटीचा प्रवर्ग टिकला तरच आरक्षण घेणार. नाही तर 50 टक्क्यांच्यावर घेणार नाही.