मालेगाव शहर कोरोनाच्या विळख्यात, तब्बल ३० रुग्ण

मालेगाव शहरामुळे नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडलाय.  

Updated: Apr 14, 2020, 02:18 PM IST
मालेगाव शहर कोरोनाच्या विळख्यात, तब्बल ३० रुग्ण  title=
संग्रहित छाया

नाशिक : मालेगाव शहरामुळे नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडलाय. आजच्या घडीला एकट्या मालेगावात कोरोनाचे तब्बल ३० रुग्ण आहेत.  मालेगावकरांना लॉकडाऊन, संचारबंदी मंजूर नाही अशी स्थिती आहे. यामुळं एका दिवसात मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे.

 मालेगावकरांमुळे एका दिवसात नाशिक जिल्हा कोरोनाच्या ग्रीन झोनमधून रेड झोनमध्ये गेला. मालेगावात कोरोना वेगानं पसरला. याला दुसरं तीसरं कोणीही जबाबदार नसून खुद्द मालेगावकरच कोरोनाच्या प्रसाराला जबाबदार आहेत. देशात लॉकडाऊन आणि राज्यात संचारबंदी असतानाही मालेगावमधे मात्र सर्व जनजीवन सुरळीत होतं. बाजारपेठेत गर्दी होती. धार्मिक स्थळी सामूहिक प्रार्थना सुरु होती. कोरोना ही प्रेशिताचीच देणगी असल्याचा संदेश कुणीतरी मालेगावकरांमध्ये पसरवला आहे. 

 मालेगावकरांना जणू कायदा नियम काही मंजूर नाही अशी स्थिती आजही आहे. ते पोलिसांनाही घाबरत नाही. पण कोणालाच न जुमानणाऱ्या या नागरिकांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोरोनाचा फैलाव रोखणे कठिण होणार आहे.