'उद्धव ठाकरेंच्या पायउताराचा बदला घ्या...' अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश

'बाळासाहेब ठाकरे यांनी पानपट्टी वाले, वाहन चालक यांना तिकिंट दिली आणि आता ते आमदार झाले, आता ही लोकं ठरवणरा शिवसेना कोणाची' अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

Updated: Feb 13, 2023, 02:22 PM IST
'उद्धव ठाकरेंच्या पायउताराचा बदला घ्या...' अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश title=

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ज्या प्रकारे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं, त्याचा बदला आपल्याला पोटनिवडणुकीत घ्यायचाय, असं अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं. तसे आदेशच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. तर ही निवडणूक राज्यातल्या अस्थिरतेविरोधात लढा असल्याचं आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) म्हटलंय. आज चिंचवडमध्ये (Chichwad By Election) मविआचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारासाठी मविआचा मेळावा झाला. या मेळाव्याला नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे उपस्थित होते. 

अजित पवार यांचा हल्लाबोल
या सभेत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadanvis Government) हल्लाबोल केला. तीन वर्षापूर्वी आम्ही महविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन केलं, मतमतांतरे होती, विचार धारा वेगळ्या होत्या, पण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलो, तीन महिन्यात कोरोना आला, त्यात सरकारने उत्कृष्ट काम केले, त्याची दखल न्याय व्यवस्थेने घेतली, जगाने घेतली. पण जून महिन्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गद्दारी करत सरकार पाडलं. शिवसेनेत दोनदा बंड झालं, ज्यांनी गद्दारी केली ते पडले. इजा बिजा झाला आणि आता तिज्याला वेळ दाखवायची वेळ आलीय असा टोला अजित पवार यांनी लगावला.

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
ज्यांनी गद्दारी केली त्यांचा शिवसेना उभारण्यात काय वाटा आहे, बाळासाहेबांनी या लोकांना तिकीट दिलं, पानपट्टी वाले, वाहन चालक आमदार झाले. त्यात बाळासाहेब यांचाच वाटा होता. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सभेत सांगितलं होतं आता मी वृध्द झालोय, आता शिवसेना उद्धव ठाकरे सांभाळतील, आदित्य ठाकरे यांनाही सांभाळा असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. मग सेना कोणाची हे शिंदे कोण ठरवणार असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

राहुल कलाटे यांना टोला
चिंचवड पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदावर सांगातयात मला एक लाखाच्या वर मतं मिळाली. पण ती मतं त्याची एकट्याची होती का? आम्ही पाठिंबा दिला. असं सांगत अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यावर निशाणा साधला. राहुल कलाटे यांचा बोलवता धनी कोणी तरी वेगळा आहे.  विरोधकांना फायदा होईल यासाठी त्याने उमेदवारी कायम ठेवली असं सांगत अजित पवार यांनी हल्लाबोल केला.

चिंचवड मतदार संघाचे दिवंगत आमदार रुग्णालयात असताना मी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली, औषध आणून दिली, पण भाजपवाले स्वार्थी आहे, विधानसभा, विधानपरिषद निवडणूकीत दुर्धर आजाराशी लढत असतानाही त्यांना मतदानाला बोलावलं, काय गरज होती, असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला

ग्रामीण भागात भाजपचं कमळ शिवसेने मुळे पोहचले आणि आता ते गद्दार झालेत, 50 खोके एकदम ओक्के, खोके शब्द या पूर्वी नव्हतं, शिव सेना ही उद्धव ठाकरे यांची आहे हे दाखवण्याची वेळ आहे असं आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं.