Maharashtra Panchayat Election Result: पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका, इतक्या जागांवर विजय तर NDAची अशी झाली अवस्था

Maharashtra Panchayat Election :  235 गावांमध्ये सरपंच जिंकण्यात भाजपला यश आले आहे. काँग्रेसने 134, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 110, शिवसेना (ठाकरे) 128 आणि 'बाळासाहेबांची शिवसेना' 114 जागा जिंकल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत 300 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

Updated: Oct 18, 2022, 08:05 AM IST
Maharashtra Panchayat Election Result: पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका, इतक्या जागांवर विजय तर NDAची अशी झाली अवस्था  title=

Panchayat Election Result 2022: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजुने कौल मिळाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने (MVA) महाराष्ट्र पंचायत निवडणुकीत (Maharashtra Panchayat Election Result) चांगली कामगिरी केली आहे. 1079 जागांपैकी 464 जागा MVA च्या खात्यात गेल्या आहेत. महाविकास आघाडी ही ठाकरे यांच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती आहे. 

महाविकास आघाडीने प्रतिस्पर्धी एनडीएपेक्षा 107 जास्त जागा जिंकल्या आहेत. एनडीएला 357 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी 258 जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेचा मूडही या निवडणुकीने जाणून घेतला आहे.  तर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर एकचा पक्ष असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  889 पैकी 397 ग्रामपंचायतींमध्ये भाजप विजयी झाल्याचे ते म्हणाले. तर हा युती सरकारच्या बाजूनं जनतेचा कौल मिळाल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीचा अंतिम निकाल

महाविकास आघाडी- 464

काँग्रेस-152
राष्ट्रवादी-157
शिवसेना (ठाकरे)-155

भाजप-शिंदे गट युती -357

भाजपा-244
बीएसएचएस-113

इतर-258
 
भाजपने मात्र महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक 397 जागा जिंकल्याचा दावा केला आहे. भाजपच्या राज्य युनिटने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'ग्रामपंचायत निवडणुकीत 397 जागा जिंकून भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'बाळासाहेबांची शिवसेना'चा एकत्रित आकडा 478 वर पोहोचला आहे.

235 गावांमध्ये सरपंच किंवा ग्रामप्रमुख पदे जिंकण्यात भाजपला यश आले आहे. काँग्रेसने 134, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 110, शिवसेना (ठाकरे) 128 आणि 'बाळासाहेबांची शिवसेना' 114 जागा जिंकल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत 300 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

मतदारांनी ‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या बाजूने निकाल दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. "आम्ही उचललेले पाऊल (उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी फारकत घेण्याचे) योग्य ठरले. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपला जनतेचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. शिंदे म्हणाले, जनतेने विश्वासाने मतदान केले आहे, हे निकालात दिसून येत आहे. दरम्यान, रायगडमध्ये शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांना त्यांच्याच गावात जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. त्यांच्याच गावात जनतेने त्यांना नाकारल्याची आता चर्चा सुरु झाली आहे.

नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व

दुसरीकडे काँग्रेसने महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा परिषदेवर आपली पकड कायम ठेवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत. जिल्हा परिषद सदस्यांच्या विशेष सर्वसाधारण सभेत काँग्रेसच्या मुक्ता कोकर्डे यांची अध्यक्षपदी तर कुंदा राऊत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 57 सदस्यीय जिल्हा परिषदेत कोकर्डे यांना 39 तर राऊत यांना 38 मते मिळाली. नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा आहे.