राज्यात सुरु होणार कोंबड्यांची झुंज? कोंबड्यांच्या झुंजीला खेळाचा दर्जा?

राज्यात कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका

Updated: Sep 20, 2022, 07:16 PM IST
राज्यात सुरु होणार कोंबड्यांची झुंज? कोंबड्यांच्या झुंजीला खेळाचा दर्जा? title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : राज्यात लवकरच कोंबड्यांची झुंज सुरु होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर कोंबड्यांच्या झुंजीला अधिकृत खेळाचा दर्जाही मिळू शकतो. कारण कोंबड्यांची झुंज सुरु व्हावी, अधिकृत खेळाचा दर्जा त्याला मिळावा म्हणून याचिका दाखल करण्यात आलीय. शेतकरी गजेंद्र चाचरकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केलीय. याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. चाचरकर यांनी याचिकेत जे युक्तिवाद केलेत ते कमालीचे आहेत. 

कोंबड्याच्या झुंजीला खेळाचा दर्जा? 
- आंध्रप्रदेशातल्या झुंजीत 3 दिवसांत 900 कोटींची उलाढाल
- कोंबडा झुंजीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
- कुक्कुटपालन, कोंबड्यांचे देशी वाण संरक्षित करायला प्रोत्साहन
- कोंबड्यांचा आहारासाठी उपयोग करण्यावर बंदी नाही

असं असताना कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी का, असा सवाल विचारण्यात आलाय. प्राण्यांना क्रूरपणे वागवण्याविरोधातल्या कायद्यामुळे कोंबडा झुंजीवर बंदी आहे. याला अपवाद 2018चा जेव्हा सुप्रीम कोर्टानं कोंबडा झुंजीसाठी सशर्त परवानगी दिली होती. पण ही बंदी झुगारुनही देशात कोंबडा झुंजी आयोजित केल्या जातात. 

त्यात आता राज्यात कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. बुधवारी कोर्ट काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.