शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणात दोषी- अतुल भातखळकर

ज्या प्रकरणात संजय राऊत जेलमध्ये आहेत त्याच प्रकरणात पवारांची चौकशी करण्याचं पत्र भाजप नेत्यानं फडणवीसांना पाठवलं आहे.  

Updated: Sep 20, 2022, 07:29 PM IST
शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणात दोषी- अतुल भातखळकर  title=

Atul Bhatkhalkar on Sharad pawar in Patra Chawl Case : पत्राचाळच्या गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेची (Shivsena) तोफ म्हणून ओळखले जाणारे नेते संजय राऊत (Sanjay Raut in Jail) जेलमध्ये आहेत. अशातच पत्राचाळ प्रकरणामध्ये (Patra Chawl Case) आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी (NCP Sharad pawar Enquri Patra Chawal Case) करण्यात यावी अशी मागणी करत पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर असल्याची टीका भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर  यांनी केली आहे. याबाबत त्यांनी फडणवीसांना पत्र पाठवलं आहे. (Atul Bhatkhalkar on Sharad pawar in Patra Chawl Case)

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला (Guru Ashish Construction) पत्राचाळीचा प्रोजेक्ट देण्यामागे राज्याचे जाणते राजे, शहंशाह शरद पवार यांचासुद्धा सहभाग होता हे आज ईडीने पुराव्यानिशी चार्जशीटमध्ये दाखवून दिलं आहे. शरद पवारांच्या म्हणजेच तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत व्हाय बी चव्हाण सेंटरमध्ये (Y. B. Cntre) बैठक होती त्यामध्ये संजय राऊत होते. त्यानंतर गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्राचाळीचं काम मिळतं. म्हणून मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवत असल्याचं भातखळकर म्हणाले.

मुंबईतल्या मराठी माणसाला बेघर करण्याच्या या कारस्थानामध्ये संजय राऊतांसोबत शरद पवार यांचा या सगळ्यामध्ये काही संबंध आहे का याची चौकशी करावी, अशी मागणी अतुळ भातखळकर यांनी केली आहे. अतुल भातळकरांनी केलेल्या खळबळजनक आरोपावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

 

ईडी चौकशी (ED Enquri)  करत असून कोर्ट काय तो निर्णय घेईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत हे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये आहेत. आधीच शिवसेनेला बंडखोरीमुळे भगदाड पडलेलं असताना राऊत आतमध्ये असल्यामुळे शिवसेना अडचणीत सापडली आहे. येत्या निवडणुकांसाठी राऊत बाहेर असणं शिवसेनेसाठी महत्त्वाचं आहे.