Mumbai-Nagpur Samruddhi Expressway connect with Delhi-Mumbai Expressway : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) आणि मुंबई-दिल्ली महामार्ग हे महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्वाचे प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पांचे काम वेगावे सुरु आहे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरुन सुरतमार्गे थेट दिल्लीला जाता येणार आहे. कारण, काम पूर्ण झाल्यावर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-दिल्ली महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी कनेक्टिव्हीटी असणार आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग भारतातील सर्वाधिक लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे. हा महामार्ग थेट राजधानी दिल्लीशी जोडला जाणार आहे. यामुळे नागपूररहून थेट दिल्ली गाठता येणार आहे. यामुळे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओखळले जाणार नागपूर शहर थेट दिल्लीशी जोडले जाणार आहे.
मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग आहे. 700 किलोमीपेक्षा मोठा असा हा महामार्ग मुंबई आणि नागपूरला जोडणारा आहे. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग 390 गावांमधून जाणार आहे. समृद्धी महामार्गील नागपूर ते शिर्डी या 520 किमी लांबीचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. यानंतर शिर्डी ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंजपर्यंत एकूण 80 किमी लांबीच्या मार्गावरुन देखील प्रवासी वाहतूक सुरु झाली आहे. समृद्धी महामर्गाचा एकूण 701 किमी पैकी 625 किमी लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. 76 किमी लांबीच्या इगतपुरी ते आमणे मार्ग हा समृद्धी महामार्गील शेवटचा टप्प्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरु झाल्यावर मुंबई ते नागपूर प्रवास फक्त 6 तासांत पूर्ण होणार आहे.
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे 24 तासांचा प्रवास 12 तासात पूर्ण होणार आहे. हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे आठ पदरीचा आहे. दिल्ली-मुंबई महामार्गावरच मुंबई - वडोदरा - जेएनपीटी बंदराला जोडणारा मार्ग आहे. समृद्धी महामर्गावर आमने येथून एका बाजूने वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे व दुसऱ्या बाजूने सध्याच्या नाशिक महामार्गासाठी एकूण सहा किमी लांबीचा जोडरस्ता बांधला जात आहे. आमने येथे समृद्धी महामार्ग संपल्यावर एक जोड रस्त्यावरुन वसई, विरार, डहाणू, सुरतमार्गे वडोदरा व तेथून हा महामार्ग मुंबई-दिल्ली महामार्गाला जोडला जाणार आहे.