अख्ख्या देशात मराठीचा कल्ला... बारामतीच्या पोरानं Motor Cycle Stunt Ride मध्ये कमावलं नाव

तामिळनाडू येथील कोईमतूरमध्ये झालेल्या मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये वेगवेगळ्या तीनही स्पर्धेमध्ये रेकॉर्डकरून बारामतीच्या रोहित शिंदे याने देशात पहिला क्रमांक मिळवून अव्वलस्थान मिळविले आहे.

Updated: Nov 11, 2022, 03:56 PM IST
अख्ख्या देशात मराठीचा कल्ला... बारामतीच्या पोरानं Motor Cycle Stunt Ride मध्ये कमावलं नाव title=

जावेद मुलानी, झी मीडिया: सध्या आपली मराठमोळी पोरं सगळ्याच क्षेत्रात नावं कमावता दिसत आहेत. कायमच चांगल्या रेकॉर्डवर आपलं नावं कमावणारी ही तरूण पिढी नव्या क्षेत्रातही आपलं नावं कमावता दिसते आहे, सध्या अशाच एका मराठमोळ्या मुलानं आपलं नावं अख्ख्या देशात कमावलं आहे. सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया या होतकरू तरूणाबद्दल. 

तामिळनाडू येथील कोईमतूरमध्ये झालेल्या मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये वेगवेगळ्या तीनही स्पर्धेमध्ये रेकॉर्डकरून बारामतीच्या रोहित शिंदे याने देशात पहिला क्रमांक मिळवून अव्वलस्थान मिळविले आहे. तामिळनाडूमधील कोईमतूर येथील सी.आर.एफ कंपनीने स्टंट वॉरफेर (Stunt Warfere) राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये फ्री स्टाईल स्टंट राईडींग (Freestyle Stunt Riding), ऑफस्टीकल टाईम चॅलेंज (Obstacle Time Challenge) व लास्ट मॅन स्टँडींग (Last Man Standing) या तिन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले आहे. 

मोटार सायकल एका चाकावर उचलून जास्तीत जास्त गाडी गोल फिरविण्याची ही स्पर्धा होती. केवळ 8 मिनिट 28 सेकंद एवढ्या कमी वेळात एका चाकावर वरील तिन्ही स्पर्धेत रेकॉर्ड केले आहे. तिन्ही स्पर्धेत एकत्रित रेकॉर्ड करणारा रोहित शिंदे हा स्टंट राईडींगमधील (Stunt Riding) पहिला खेळाडू ठरला आहे. 

सध्या स्पोर्ट्समध्ये तरूणांचा समावेश वाढतो आहे. अनेक तरूण अगदी गावागावतील तरूणही क्रिडा क्षेत्रात नावं कमावू लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं नावं देशभरातून घेतलं जात आहे. मल्लखांब (Mallakhamb), कुस्ती (Kusti) सारख्या खेळांमधूनही अनेक तरूण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत आणि पुढे जात आहेत.