Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Big Blow To Narayan Rane: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पक्षांतराची लाट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आपल्याला तिकीट मिळणार नाही याची चाहूल लागल्यानंतर अनेकजण अगदी पक्ष बदलून विरोधी विचारसरणीच्या पक्षात प्रवेश मिळतो का याची चाचपणी करु लागले आहेत. काहींनी तर पक्षांतरही केलं आहे. आगामी काळात अधिक पक्षांतरे होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनं नारायण राणेंना मोठा धक्का दिला आहे. नाराणय राणेंबरोबर शिवसेना सोडणारा एक महत्त्वाचा नेता आता स्वगृही म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. केवळ प्रवेशच नाही तर हा नेता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांविरोधात विधानसभा निवडणुकही लढणार आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही उद्धव ठाकरेंच्या शिवससेनेनं धक्का दिला आहे. 'काय झाडी, काय डोंगर' फेम एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या शहाजी बापू पाटलांच्या सांगोला मतदारसंघातून अजित पवार पक्षाचे दीपक आबा साळुंखे हे आज संध्याकाळी 4 वाजता मातोश्री येथे ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. याशिवाय अजित पवारांच्या पक्षाचेच चिंचवड येथील मोरेश्वर बोंडवे हे सुद्धा ठाकरेंच्या पक्षात सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रवेश करणार आहेत.
सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात ठाकरेंच्या सेनेतून दीपक आबा साळुंखे मैदानात उतरणार असल्याचं मानलं जात आहे. मात्र सांगोल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत या पक्षप्रवेशाने गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा >> शरद पवारांनी एका दगडात मारले दोन पक्षी! अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला? CM शिंदे, अजित पवारांना धक्का
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कोकणात भाजपसोबतच नारायण राणेंना मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे विश्वासू राजन तेली हे आज सायंकाळी पाच वाजता 'मातोश्री' या ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडीतून एकनाथ शिंदेंच्या पक्षातील दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी दिली जाणार आहे. त्यामुळे यंदा सावंतवाडीमधील निवडणुकीची चूरस अधिक वाढणार आहे.
नक्की वाचा >> शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यश
काल बैठकीला बोलवलेल्या विद्यमान आमदारांनी तात्काळ एबी फॉर्म न घेता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळं काल एबी फॉर्म दिले गेले नाहीत. उद्धव ठाकरे आजारी असल्याने दोन-तीन दिवसांनी हे आमदार पुन्हा मातोश्रीवर येऊन एबी फॉर्म घेणार आहेत.