महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात महिलांसाठी काय ?

 यामध्ये शेतकरी, शिक्षण, महिला, रोजगार यांना प्राधान्य देण्यात आले आहे. 

Updated: Nov 28, 2019, 04:39 PM IST
महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात महिलांसाठी काय ?  title=

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचा शपथविधी थोड्याच वेळात शिवतीर्थावर पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तसेच तीन्ही पक्षांचे प्रत्येकी दोनजण असे एकूण सहाजण यावेळी शपथ ग्रहण करणार आहेत. देशभरातील महत्वाच्या नेत्यांना या शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीतर्फे आपले सरकार पुढच्या ५ वर्षात कसे काम करणार ? याबद्दल समान किमान कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये शेतकरी, शिक्षण, महिला, रोजगार यांना प्राधान्य देण्यात आले आहे. 

महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे समान किमान कार्यक्रमात जाहीर करण्यात आले आहे. आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार असल्याचे यात म्हटले आहे. महानगर आणि जिल्हा मुख्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहे
वर्किंग वुमनसाठी हॉस्टेल बांधणार असल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 

अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविकांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्या मागण्या आता प्राधान्यक्रमाने घेतल्या जाणार आहेत. अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविका आणि आशा गट प्रवर्तकांच्या मानधन आणि सेवा सुविधेमध्ये वाढ करण्यात येणार आहे. महिला बचत गट सक्षमीकरणासाठी सर्वोच्च प्राधान्य असणार असे यात जाहीर करण्यात आले आहे.

शिक्षण

* शिक्षणाचा दर्जा उंचावणार
* आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि शेतमजुरांच्या उच्च शिक्षणासाठी शुन्य टक्के व्याजदर कर्ज योजना राबवणार

शहरविकास

* मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना अंमलात आणून सर्व नगरपरिषदा, नगरपालिका, नगरपंचायती व महानगरातील रस्त्यांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करणार.
* मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातंर्गत ३०० चौरस फुटांऐवजी ५०० चौरस फुट चटईक्षेत्र असलेल्या सदनिका देण्यात येतील. त्यामध्ये उत्तम पायाभातू सुविधा प्राधान्याने पुरविण्यात येतील.